प्रतिनिधी सचिन वाघे
समुद्रपूर : काही दिवसांपूर्वी कर्तव्य बजावताना पोलिस कर्मचाऱ्याच्या गळ्यावर चाकूने वार झाल्याची घटना ताजी असतानाच, आता वाळूचे वाहन सोडण्यासाठी पैशांची मागणी केल्याच्या आरोपामुळे समुद्रपूर पोलीस ठाणे पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.#CrimeNews
एकाच पोलीस ठाण्याशी संबंधित दोन वेगवेगळ्या घटनांमुळे पोलिस यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.WardhaNews
काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या संशयिताला ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या समुद्रपूर पोलिसांच्या पथकावर हल्ला करण्यात आला होता.WardhaNews
यावेळी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या गळ्यावर धारदार चाकूने वार करण्यात आला, तर सहकाऱ्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दुसऱ्या कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली.
या घटनेनंतर संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.ही घटना चर्चेत असतानाच आता समुद्रपूर पोलीस ठाण्यातील राहुल साठे आणि सुमित भुते या कर्मचाऱ्यांवर वाळूचे वाहन सोडण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी करून त्यापैकी ४० हजार रुपये स्वीकारल्याचा आरोप समोर आला आहे.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाल्याचे वृत्त आहे.






