Crimenews:शेतीच्या कामाकरिता व खत वाहण्यासाठी माझे ट्रॅक्टर का सांगितले नाही?
या कारणावरून पुतण्याने काकाच्या छातीवर कुऱ्हाडीने वार करत काकाची हत्या केल्याची घटना नांदूरा येथे आज सकाळी समोर आली आहे. खुनी पुतण्या या घटने नंतर थेट पोलीस ठाण्यात हजर झाला होता.
घटना अशी आहे की, 29 मार्च रोजी सकाळी साडेदहावाजता च्या सुमारास खुनी शुभम विठ्ठल बोके (30) रा. सोनज (इसबपूर) ता. नांदूरा जि. बुलढाणा याने त्याचेच काका गोपाल मनोहर बोके (45) रा. सोनज इसबपूर यांना त्यांच्या घरी जावून ‘शेतीच्या कामाकरिता व खत वाहण्यासाठीपुतण्या माझे ट्रॅक्टर का सांगितले नाही?’
या कारणावरून शिवीगाळ करीत वाद घातला. घरात कुटुंबीय हजर असताना घरासमोर पुतण्या शुभमने काका गोपाल यांच्यावर कुऱ्हाडीने छातीवर वार केला.
Crimenews : त्यामुळे गंभीर जखमी झालेले गोपाल मनोहर बोके रुग्णालयात गतप्राण झाले. याप्रकरणी त्यांचा मुलगा विश्वजीत गोपाल बोके यांनी पोलिसात तक्रार दिल्यावरून आरोपी शुभम विठ्ठल बोके याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे.