दिनांक 15 ऑगस्ट रोजी गावात ग्रामसभा घेऊन भव्य मोटर सायकलने गावातील अवैध दारू बंद व्हावी यासाठी सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, माजी सैनिक, ग्रामपंचायत उपसरपंच पंचफुलाबाई पवार, गावकरी मंडळी यांच्यामार्फत पोलीस स्टेशन संग्रामपूरला निवेदन देण्यात आले होते,
तरीही गावातील काही दारू विक्री प्रमाण चालूच होते, त्यामुळे आज दिनांक 19 ऑगस्ट रोजी माननीय श्री रामकिसन माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वात सापळा रुचून गावात सुरू असलेल्या अवैध भट्ट्या निस्तनाभूत करण्यात आल्या, त्यावेळी शेख सलीम शेख सत्तार होमगार्ड प्रफुल मारोडे ( बबलू) सरपंच पती राहुल मेटांगे उपस्थित होते.
Darunews/कारवाई पूर्ण झाल्यानंतर सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे, सचिव हेमंत बापू देशमुख व गावकरी मंडळी यांच्या वतीने माननीय श्री राम किसनजी माळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, शेख सलीम शेख सत्तार होमगार्ड, व गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मारोडे, यांचा शाल श्रीफळ व छत्रपतींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.