Dharavi cylinder Blast:मुंबई, २४ मार्च २०२५ – सोमवारी रात्री धारावीतील पीएमजीपी कॉलनी परिसरात गॅस सिलिंडर वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये भीषण आग लागून अनेक स्फोट झाले. या घटनेने परिसरातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.
Prashantdikkar / राजकीय खेळ की शेतकऱ्यांचे हित? डिक्कर प्रकरणाचा नवा वळण
स्थानिक आमदार बाबूराव माने यांच्या म्हणण्यानुसार, नेचर पार्कजवळ उभ्या असलेल्या सिलिंडर ट्रकला आग लागली. त्यानंतर सुमारे १२ सिलिंडरचे स्फोट झाले.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अथक प्रयत्न केले.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
खासदार वर्षा गायकवाड यांनी या घटनेवर टीका केली आहे. त्यांच्या मते, ‘नो पार्किंग’ क्षेत्रात अशा प्रकारचे धोकादायक वाहन उभे करणे हे मुंबईकरांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे. त्यांनी पालिकेच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
Dharavi cylinder Blast:या घटनेमुळे परिसरातील अनेक वाहने जळून खाक झाली आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने स्थानिक नागरिकांना जवळच्या मैदानात हलवण्यात आले होते. अधिकाऱ्यांनी नागरिकांना घटनास्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले होते.