मका पिकांवर रानडुक्कर यांचा हौदास,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांच्या कडून पाहणी.(FarmerNews)

0
7

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

FarmerNews:आरमोरी:-आरमोरी हे गडचिरोली जिल्ह्यातील एक सर्वच क्षेत्रात उन्नत तालुका म्हणून ओळखला जातो.या तालुक्यातील बहुतांश लोकांचा जीवनमान हे कृषी वर विसंबून आहे.

“पाण्याच्या चणचणीतून आत्महत्या; राज्य पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याची धक्कादायक घटना” (Buldhana Farmer Suicide )

या भागात धान्य,गहू व मका पिकाची लागवड केली जाते.आरमोरी साजा क्रमांक चार,सर्वे क्रमांक नवशे सतरा मध्ये मका पिकाची लागवड केली आहे.

परंतू काही दिवसांपासून रानडुक्कर यांनी हौदास घालून मका पिकाची नासाडी केली आहे.त्यामुळे येथील गरीब शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.अक्षरश: शेतकऱ्यांच्या तोंडचा घास निसटला आहे.

त्यामुळे आरमोरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार रामदास मसराम यांनी प्रत्यक्ष झालेल्या पिकांची शेतीवर जाऊन पाहणी केली आणि शासनाकडे नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासित केले आहे.

FarmerNews:प्रसंगी सेवा निवृत्त केंद्र प्रमुख मेघराज बुरांडे, लोकप्रिय पान सेंटरचे मालक संजूबाबा मेश्राम व इतर शेतकरी यांनी आमदार रामदास मसराम यांना निवेदन सादर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here