मुलीच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रा वरील क्यू. आर कोड रेखांकित करावी(Hingnghat)

0
3

 

प्रतिनिधी सचिन वाघे वर्धा :-

शल्य चिकित्सक जिल्हा सामान्य रुग्णालय, वर्धा यांना शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाच्या वतीने तालुकाप्रमुख हिंगणघाट सतीश धोबे यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले की,वैवाहिक मुलीच्या विवाह नोंदणी प्रमाणपत्रा वरील क्यू. आर कोड रेखांकित करणे गरजेचे आहे कारण आपल्या विभागामार्फत प्रत्येक विवाहाची नोंदणी करून त्यानंतर नवविवाहितांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात येते.

आमदार समिर कुणावार यांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी मैहरच्या देवीला साकडे(Samirkunavar)

परंतु आमच्या असे लक्षात आले की ,नवविवाहित वधू तिचे आधार कार्ड वरील पूर्वीचे नाव वडिलांचे असल्यामुळें तीचे विवाह झाल्यानंतर वर पक्षाकडील नाव आधार कार्डवर बदलून नवीन कार्ड पाहिजे असते. शासनाच्या वतीने राबविण्यात आलेले आधार केंद्र येथे जेव्हा नाव दुरुस्ती करिता जातात तेव्हा अडचणी निर्माण होतात.

जर आपल्या विभागामार्फत विवाह नोंदणी प्रमाणपत्रावरील क्यू .आर कोड रेखांकित करण्यात आला तर, त्यांना त्या आधार केंद्रावरील वडीलाचे नाव बदलून पतीचे नाव व पत्ता बदलविण्यास अडचण निर्माण होणार नाही. तसेच आधार कार्ड झाले की , त्यांना नव्या ठिकाणी मतदार यादीत मतदार ओळखपत्र तयार करण्यास सोयीचे होईल.

Hingnghat :तरी सदर बाब महत्त्वाची समजून यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा. निवेदन देतांना उप तालुका प्रमुख प्रकाश अनासाने, नगर सेवक मनीष देवडे, शंकर मोहमारे, शहर संघटक गजानन काटवले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here