प्रतिनिधी सचिन वाघे
हिंगणघाट दि.०५ सप्टेंबर
Hingnghat:गिमाटेक्स वणी युनिट येथिल कंत्राटी कामगार म्हणून गेल्या ४ ते ५ वर्षापासुन काम करीत होते.
वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटने अध्यक्ष तथा आमदार श्रीयुत समिर कुणावार व संघटनेचे उपाध्यक्ष मिलिंद देशपांडे यांच्या निर्देशानुसार गिमाटेक्सचे फॅक्टरी मॅनेजर पठाण यांचेमार्फत पाठपुरावा करून उत्कृष्ठ कामगारांना ज्येष्ठता व तिन वर्षांची हजेरी सेवा पाहून कंत्राटी कामगारांना कायम स्वरुपी करण्यात यावे असे बैठकीत ठरविण्यात आले होते.
गिमाटेक्सच्या कंत्राटी कामगारांना कंपनी मस्टर रोलवर घेऊन किमान वेतन बदली कार्डचे वितरण..( Hingnghat )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
या अनुषंगाने दि. ०२ सप्टेंबर रोजी आमदार तथा संघटनेचे अध्यक्ष समिर कुणावार व संघटनेचे जनरल सेक्रेटरी पांडुरंग बालपांडे व संघटनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते वर्धा जिल्हा सुती मिल मजदूर संघटनेच्या वतीने २४ कंत्राटी कामगारांना किमान वेतन बदली कार्डचे वितरण करण्यात आले.
Hingnghat :यावेळी संघटनेचे पदाधिकारी दामोदर देशमुख, जिवन भानसे, प्रशांत शेळके, राकेश तराळे, जयंत बावणे, हेमंत भगत, श्रावण थुटे, विनोद कोल्हे, लक्षण जयपुरकर, राहुल देशमुख, विनोद कावळे, मनोज जुमडे,विजय थुल, दिवाकर बरबटकर ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.