अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी सह ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
journalist:अकोला:जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील चोहोट्टा बाजार व परिसरातील युवा पत्रकार तथा रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ युवा अध्यक्ष, ग्रामीण पत्रकार संघटनेचे तालुका प्रसिद्धी प्रमुख, पुर्णाजी खोडके यांना,तरुणाई फाउंडेशनच्या वतीने आयोजित सहाव्या अकोला जिल्हा साहित्य संमेलनामध्ये राज्यस्तरीय, युवाश्री स्वामी विवेकानंद, पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
यावेळी हास्यजत्रा फेम कलावंत कुणाल मेश्राम, प्रसिद्ध होमिओपॅथी तज्ञ डॉ संदीप चव्हाण, श्रेष्ठ साहित्यिक प्रा. सतीश तराळ, तरुणाई फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप देशमुख, पत्रकार संजय कमल अशोक, प्रा. देवानंद गावंडे, डॉ. किरण वाघमारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन पुर्णाजी खोडके यांना राज्यस्तरीय युवाश्री स्वामी विवेकानंद पुरस्काराने सन्मान करण्यात आले.
पुर्णाजी खोडके हे चोहोट्टा परिसरातील पत्रकार असुन अनेक, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अनेक पुरस्कार व युवाश्री पुरस्कार प्राप्त पत्रकार असून, त्यांनी आतापर्यंत अवैद्य धंदे विरोधत, घरकुल प्रश्न ,आरोग्य प्रश्न, रस्ते,पाणी ,तलाठी मुख्यालय संदर्भात ,
अकोल्यात शेतकरी पेटला बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केला चक्का जाम ( formernews )
विद्यार्थ्यांसंदर्भात ,शेतकरी बांधवांसंदर्भात ,अपंग निराधार संदर्भात, विविध क्षेत्रात सामाजिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिलेले आहे..गोरगरीब अपंग दिव्यांग दिणदलीत लोकांसाठी शाहू फुले आंबेडकर गाडगे महाराज तुकडोजी महाराज यांचे विचार घेऊन सेवाभावी वृत्तीने काम करत आहेत.
journalist:पुर्णाजी खोडके अनेक उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात कामगिरी बद्दल पूर्णाजी खोडके यांना युवाश्री पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.