Kabbadi :सिंदी रेल्वे येथे आमदार चषक भव्य कबड्डी सामने

0
2

 

 

सेलू तालुका प्रतिनिधी गुड्डू कुरेशी

स्टार क्रिडा मंडळ चे आयोजन

सिंदी रेल्वे ता.१ :Kabbadi: कबड्डीचे माहेर घर असलेल्या सिंदी रेल्वे शहरात ३ स्टार क्रिडा मंडळाने शनिवारी ता.१३ ते सोमवार ता.१५जानेवारी दरम्यान म्यु. नेहरू विद्यालयाच्या स्टेडियम वर आमदार समीर कुणावार चषक भव्य पुरुष कबड्डी सामन्याचे आयोजन केले आहे.


विशेष म्हणजे प्रथम पुरस्कार १ लाख १ हजार १ रुपया रोख वडीलांच्या स्मुतीप्रित्यर्थ हेमंत पाटील, हरीभाऊ घंगारे, दिपकसिंग राठोड यांच्या वतीने तर द्वितीय पुरस्कार ७१ हजार १ रुपया रोख वडील व भाऊ यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मनोज देवतळे, रवी बेलखोडे, स्वप्नील बेलखोडे यांच्या तर्फे तर तृतीय पुरस्कार ५१ हजार १ रुपया रोख कै.पहेलवान कमलेश महाजन यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मनिष व गुड्डू महाजन यांच्या तर्फे देऊन विजेत्या संघाला सन्मानित करण्यात येणार आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

त्याचप्रमाणे अंतीम विजेत्या आणि उपविजेत्या संघास बबलू खान तर्फे भव्य चषक तर तृतीय संघास गणेश काळबांडे तर्फे चषक दिल्या जाणार आहेत.

याशिवाय वैयक्तिक बक्षिसात संपुर्ण स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडूला ७ हजार ७७७ रुपये रोख विलास पाटील यांच्या कडुन तर अंतीम सामन्यात उत्कृष्ट खेळाडूला ११ हजार १११ रूपये रोख अमोल गवळी कडुन तर प्रथम बोनस अधिक गडी बाद करणार्‍या खेळाडूला ५ हजार ५५५ रूपये रोख मुरलीधर कलोडे यांच्या कडुन आणि प्रथम पकड करणार्‍या खेळाडूला ५ हजार ५५५ हरीभाऊ हिवरकर यांच्या तर्फे देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

Kabbadi :स्पर्धेची प्रवेश फी १५०१ रुपये , लेट फी व तक्रार फी २००१ रुपये असुन जास्तीत जास्त पुरुष कबड्डी संघानी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन ३ स्टार क्रिडा मंडळाचे अध्यक्ष हेमंत पाटील, उपाध्यक्ष हरीभाऊ घंगारे, सचिव रविद्र बेलखोडे, सहसचिव स्वप्निल बेलखोडे, कोषाध्यक्ष दिपकसिंग राठोड, प्रवक्ता अनिल चांदेकर, शरद तळवेकर क्रिडा प्रमुख मनोज देवतळे, राजु वेले, संघटक उमेश नखाते, विकास बोंगाडे तर मार्गदर्शक प्रा.मनोहर फुसे आदी थ्री स्टार क्रिडा मंडळाच्या पदाधिकााऱ्यांनी केले आहे

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here