Home Breaking News MarathiNews / रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवरून महायुतीत खळबळ; मंत्री नाराज?

MarathiNews / रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठीवरून महायुतीत खळबळ; मंत्री नाराज?

3
 

संपादक : अनिलसिंग चव्हाण

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून महायुतीमध्ये पुन्हा एकदा मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिक्षा आणि टॅक्सीचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ दिल्याने शिंदेसेनेचे मंत्री नाराज असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे.eknathshinde

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी रिक्षा-टॅक्सीचालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याची भूमिका घेतली होती.

मात्र, २७ ऑगस्ट रोजी रिक्षा-टॅक्सीचालकांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर फडणवीस यांनी एक वर्षाची मुदतवाढ जाहीर केली.

या निर्णयापूर्वी परिवहन मंत्रालयाला विश्वासात घेतले नसल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये नाराजी असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. Devendrafadnvis

दोन दिवस आधी परिवहन मंत्र्यांची वेगळी भूमिका आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचा निर्णय यामुळे भाजप-शिवसेनेतील अंतर्गत मतभेद पुन्हा चर्चेत आले आहेत.

MaharashtraPolitics/आता या मुद्द्यावर महायुतीतील नेत्यांची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.political