Home नांदेड murdernews/ ४आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मग कथित मास्टरमाईड कुठे? नांदेड हत्याकांडाने उपस्थित केले...

murdernews/ ४आरोपी पोलिसांच्या ताब्यात, मग कथित मास्टरमाईड कुठे? नांदेड हत्याकांडाने उपस्थित केले सवाल??

0
2

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक)

आतापर्यंत ४ आरोपी अटकेत; कथित मुख्य आरोपी नितीन बिलानिया अद्याप पोलिसांच्या हाती नाही!‘मास्टरमाइंड’ असल्याचा दावा; सिकलीगर समाजाचा पोलिसांवर पूर्ण विश्वास, मात्र मुख्य आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी

नांदेड येथे इंद्रजीतसिंग बावरी यांच्या हत्या प्रकरणाने सिकलीगर समाजात तीव्र संताप आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण केले आहे.

या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना पोलिसांनी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या प्रकरणातील कथित मुख्य आरोपी नितीन बिलानिया अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नसल्याने तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुख्य आरोपी नेमका कुठे?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन बिलानिया याच्यावर या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कथित मास्टरमाइंड असल्याचा आरोप केला जात आहे. Policenews

मात्र या आरोपांची अंतिम सत्यता तपासातून आणि न्यायालयीन प्रक्रियेतूनच स्पष्ट होणार आहे.चार आरोपी अटकेत असताना कथित मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या कोसो दूर असल्याने, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोणती पावले उचलली आहेत?, nandedmudernews

तो नेमका कुठे आहे?, तसेच त्याला अटक करण्यास विलंब का होत आहे?, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.mudernews

सिकलीगर समाजाचा पोलिसांवर पूर्ण विश्वास
या प्रकरणात सिकलीगर समाजाने पोलिस प्रशासनावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. पोलिसांनी निष्पक्ष आणि सखोल तपास करून या हत्येच्या घटनेमागील संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, अशी समाजाची अपेक्षा आहे.

तसेच केवळ अटक केलेल्या आरोपींपर्यंत तपास मर्यादित न ठेवता, या प्रकरणामागे आणखी कोणी व्यक्ती सहभागी आहे का, कटाचा नेमका उद्देश काय होता आणि हत्येमागील संपूर्ण पार्श्वभूमी काय आहे, याचा तपास करण्याची मागणी होत आहे..indrajitsing bavr

‘मुख्य आरोपीला कधी अटक?’ हा सर्वात मोठा सवाल इंद्रजीतसिंग बावरी हत्या प्रकरणात चार आरोपी अटकेत असले तरी कथित मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा आरोप आहे.

त्यामुळे आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. पोलिस मुख्य आरोपी नितीन बिलानियाला लवकरच ताब्यात घेणार का?त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी कोणते पुरावे आणि तपासाचे धागेदोरे हाती घेतले आहेत?

या हत्याकांडामागील खरा कट काय आहे?
या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलिस तपासातून समोर येणे अपेक्षित आहे.

न्याय मिळण्याची समाजाची अपेक्षा
इंद्रजीतसिंग बावरी यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा आणि दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी होत आहे. या प्रकरणाचा तपास निष्पक्ष, पारदर्शक आणि कोणत्याही दबावाशिवाय व्हावा, अशी समाजाची भावना आहे.indrajitsing bavri murder nanded

सिकलीगर समाजाचा पोलिस प्रशासनावर विश्वास आहे; मात्र हा विश्वास कायम ठेवण्यासाठी कथित मुख्य आरोपीचा शोध घेऊन त्याला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेणे आणि संपूर्ण प्रकरणाचा छडा लावणे महत्त्वाचे ठरणार आहे.indrajitsing bavri

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here