संग्रामपूर(अनिलसिंग चव्हाण )ः-मराठी पत्रकार परिषद संलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाची सभा दि.२५ / डिसेंबर/ २०२५ रोजी तालुका कार्यालय वरवट (बकाल) येथे तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील दांदळे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा घेण्यात आली.
सभेत आसे ठरविण्यात आले की,काही अपरिहार्य कारणास्तव ह्या वर्षी दि.६ /जानेवारी /२०२६ रोजी पत्रकार दिन हा कोणतेही उपक्रम व सत्कार समारंभ,बक्षिस वितरण इतर कार्यक्रम न घेता साध्या स्वरुपात साजरा करण्यात येणार आहे.
सभेमध्ये मागील सभेचा आढावा घेऊन केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली.व विविध विषयावर चर्चा करण्यात येवून संग्रामपूर तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार सःघाचे अध्यक्ष स्व. केशव घाटे (अण्णा) यांचे गेल्या नोव्हेंबर महिन्यात निधन झाल्याने येत्या ६ / जानेवारीला पत्रकार दिनी कोणत्याही प्रकारचे विविध उपक्रम व सत्कार समारंभ तसेच बक्षीस वितरण असे इतर कार्यक्रम न घेता फक्त पत्रकार दिनी स्व. केशव घाटे यांच्या बाबतीत दुखवटा व्यक्त करून त्यांना व इतर ठिकाणी निधन झालेल्या पत्रकारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे अर्धाकृती पुतळ्याचे पूजन करून पत्रकार दिनाचा समारोप करण्यात येईल.
तरी तालुक्यातील आपल्या सर्व पत्रकारांनी पत्रकार दिनी उपस्थित रहावे.असे आवाहन करण्यात आले. ह्यावेळी मराठी पत्रकार परिषद मुंबईशी सलग्नित संग्रामपूर तालुका पत्रकार संघाचे सन्माननीय पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.








