Sangitraobhongal/महिला प्रभागसंघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो-संगितराव भोंगळ

0
41

 

पातुर्डा-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत वार्षिक सर्वसाधारण सभेच्या माध्यमातुन विकासात्मक दुष्टीकोण स्पष्ट होतो तसेच अशा सभामधुन वर्तमान स्थिती सह भविष्यातील विकास बद्दल सकारात्मक हेतु साध्य होतो त्यामुळे अशा सभांची उभारणी करण्याची गरज असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष उपाध्यक्ष तथा बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ यांनी व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रमुख म्हणुन ते उपस्थित होते.

दि.१५ सप्टेंबर २०२५ रोजी क्रांती महिला प्रभागसंघ पातुर्डा यांच्या वतीने सभेचे आयोजन करण्यात आले आहे‌. संग्रामपुर तालुक्यातील वानखेड फाटा येथे आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी ज्योती संदीप वानखेडे यांची उपस्थिती होती.

तर मा.तहसीलदार पाटील साहेब, सहायक गट विकास अधिकारी टाले साहेब मा.जि.प.सदस्य ज्ञानदेवराव भारसाकडे, जिल्हा व्यवस्थापक श्री. तऱ्हेकर साहेब, तालुका अभियान व्यवस्थापक कक्ष तसेच कर्मचारी राऊत साहेब,भगवान इंगळे, कृष्णा देशमुख, परशुराम लोखंडे,कृषी विभाग डी.आर.पी. विजय आस्वार, क्रांती महिला प्रभाग संघाच्या सचिव प्रतिभा पुंडे, कोषाध्यक्ष साधना दुगाणे, आय सी आर पी ताई सह मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती. प्रभागाअंतर्गत ४५० स्वयंसहायता समुहातील सर्व महिलांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

आयोजित वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रामुख्याने मागिल वर्षात प्रभागसंघाने केलेल्या कामाचा आढावा आणि पुढील वर्षाचे नियोजन या संबंधी चर्चा करण्यात आली, प्रभागसंघाचे धोरणात्मक निर्णय, उपसमितीने केलेल्या कामाचा आढावा घेणे, वार्षिक सभासदत्व अणि भाग भांडवल या बाबत निर्णय घेणे, प्रभागसंघाच्या काम सुरळीत चालण्यासाठी नियम,नियमावली,तयार करणे,
प्रभागसंघाच्या कर्मचाऱ्यांच्या कामाचा आढावा घेणे,

Sangitraobhongal/गावातील तालुक्यातील सामाजिक प्रश्नांवर चर्चा आणि त्या संबंधित उपाययोजनांसाठी नियोजन करणे, सदस्यांना प्रभाव संघाने केलेल्या विविध उपक्रमांची माहिती देणे, यांसह महत्वाचे असे की, वार्षिक अंदाजपत्रकास मान्यता देणे तरतुदी सुचविणे यासह विविध विकासात्मक विषयावर चर्चो करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here