Sarpanchnews /पळशी झाशी येथील सरपंच सौ. प्रियंका राहुल मेटांगे अहिल्यानगर येथे राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित.

0
13

 

अहिल्यानगर येथे पार पडलेल्या सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित आदर्श सरपंच सन्मान सोहळा 2025 यामध्ये ग्रामपंचायत पळशी झाशी येथील सरपंच सौ प्रियंका राहुल मेटांगे यांना राज्यस्तरीय आदर्श सरपंच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,

गावात काम करत असताना सामान्य माणसाला केंद्रबिंदू ठेवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचण्याचा पुरेपूर प्रयत्न तसेच गावात मोठ्या प्रमाणात केलेल्या विकास कामांची दखल म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात आला,

सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार त्यांना श्री महंत डॉ. श्रीकांत धुमाळ उज्जैन, माननीय डॉक्टर शंकर अंदानी, माननीय रुचिता देसाई सिने अभिनेत्री, भाऊसाहेब पावसे, माननीय बाबासाहेब पावसे, यांच्या हस्ते देण्यात आला.त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रफुल मारोडे उपस्थित होते.

गावात केलेल्या विकास कामांच्या भरोशावर ग्रामपंचायत पळशी झाशी व सरपंच सौ. प्रियंका मेटांगे यांनी यापूर्वी सुद्धा नाशिक येथे गुरुमाऊली तसेच न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब यांच्या हस्ते आदर्श महिला पुरस्कार, बुलढाणा येथे जिल्हास्तरीय लोकमत सरपंच अवार्ड, लोणावळा येथे अखिल भारतीय सरपंच परिषद तर्फे राज्यस्तरीय आदर्श महिला सरपंच, संभाजीनगर येथे पहाट फाउंडेशन तर्फे आदर्श महिला सरपंच, तसेच पंचायत समिती मार्फत, तसेच गावात व तालुक्यात ठिकठिकाणी जवळपास 50-60 ठिकाणी गावात केलेल्या विकास कामांबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला,

तसेच मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानामध्ये सुद्धा ग्रामपंचायतने पुढाकार घेऊन विविध उपक्रम राबवले आहेत, व गावातील विकास सुरू आहे.

Sarpanchnews /पुरस्कार मिळाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सरपंच सौ प्रियांका राहुल मेटांगे यांनी आयोजकांचे आभार मानले, तसेच मिळालेला पुरस्कार नेहमी सहकार्य करणारे सचिव माननीय श्री हेमंत बापू देशमुख, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर, बचत गट महिला, तसेच गावातील नागरिकांचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य यामुळेच हा पुरस्कार आम्हाला मिळाला..
यामध्ये गावकऱ्यांचा सिंहाचा वाटा आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here