या पठ्ठ्याने गावाचा नाव मुंबईत चमकविले विनोद इंगळे यांना मुंबई उद्योजक गौरव पुरस्कार( shegaonnews )

0
2

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव. दि १५ उद्योजक गौरव पुरस्कार २०२४’ या कॉर्पोरेट क्षेत्रातील एक मोठा पुरस्कार मानला जातो. यावर्षीच्या पुरस्काराचे मानकरी म्हणून बुलढाणा जिल्हयातील आळसाणा या गावातील युवा उद्योजक इंजिनियर विनोद इंगळे यांची निवड करण्यात आली आहे.

बांधकाम क्षेत्रात उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल ही निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार सिनेक्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

विनोद भिकाजी इंगळे हे मूळचे शेगाव तालुक्यातील आळसना येथील असून शिक्षणांनंतर करियर घडविण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली आणि आपल्या मेहनतीच्या भरवश्यावर मुंबईतच “विनोद बिल्डकाँन” नावाची कंपनी स्थापन करून आपलं विश्व निर्माण केलं.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

लिफ्ट मॅन स्विफ्ट मीडिया , मुंबई या संस्थेकडून दरवर्षी व्यवसाय आणि उद्योगक्षेत्रामध्ये सातत्याने भरीव कामगिरी करणाऱ्या, तसेच चाकोरीबाहेरील नव्या वाटा धुंडाळणाऱ्या उद्योजकांना उद्योजकता विकास, उत्पादकता, संशोधन, ग्रामीण रोजगार, निर्यात क्षमता आदी विविध निकष लक्षात घेऊन या उद्योजकांची निवड करण्यात येते.

यावर्षी उद्योजक गौरव पुरस्कार २०२४ साठी इंजिनियर विनोद इंगळे यांना हा प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार सिनेक्षेत्रातील अभिनेत्री पूजा सावंत यांच्या हस्ते टीप टॉप प्लाझा मुलुंड येथे विशेष उपस्थितीत प्रदान करण्यात आला.

 

shegaonnews: विषेता विनोद इंगळे हे खामगांव चे प्रतिष्ठित नागरिक कालकथित शंकरराव पुताजी वानखेडे (रेल्वे ड्रायव्हर) तसेच दलितमित्र सिताबाई शंकरराव वानखेडे यांचे पंतू आहेत.या यशाचे श्रेय विनोद इंगळे त्यांचे आजोबा सुभाष वानखेडे, राजुभाऊ वानखेडे व सर्व वानखेडे परिवार खामगांव तसेच आई वडील, भाऊ, बहीण,मित्र, सर्व इंगळे परिवार तसेच सर्व पहुरकर परिवार आळसना यांना देतात. त्यांच्या या यशामुळे आळसना गावच नाही तर शेगांव तालुका, बुलडाणा जिल्हयाचे नावं रोशन केले आहे.

————————-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here