Umrganews /स्मशानभूमीच्या रस्त्यासाठी मातंग समाजाचा ग्रामपंचायती समोर ठिय्या ; आश्वासनानंतर अंत्यविधी

0
88

सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

उमरगा: उमरगा तालुक्यातील एकोंडी येथील जेष्ठ नागरिक नागोराव दुनगे यांचे १ जानेवारी रात्री ८:३० वाजता निधन झाले. परंतु २ जानेवारी रोजी मयत नागोराव दुनगे यांच्या अंत्यविधीसाठी स्मशानभूमीला जाण्यासाठी रस्ताच नसल्याने मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायत समोर ठिय्या मांडला.

Dharashivnews /मातंग समाजातील नागरिकाच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र स्मशानभूमी आहे. परंतु स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायती समोर ठिय्या आंदोलन मांडत रस्ता उपलब्ध करून देण्याची मागणी केली. वारंवार मागणी करुनही प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही.

यामुळे मातंग समाजातील नागरिकांनी ग्रामपंचायती समोर ठिय्या मांडल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी संभाव्य वाद होऊ नये म्हणून गावातील काही सुज्ञ नागरिक, तसेच तहसीलदार, सरपंच, गटविकास अधिकारी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी यांनी वेळीच चर्चा करुन स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता लवकर करण्यात येईल असे तोंडी आश्वासन मध्यस्थी लहुजी शक्ती सेनेचे तालुका अध्यक्ष विजयभाऊ तोरडकर व मराठवाडा उपाध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांना देण्यात आले.

Umrganews /या दिलेल्या तोंडी आश्वासनानंतर ग्रामस्थांचा रोष कमी झाला आणि एकोंडी गावातून गेलेल्या पळसगाव रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार केले.मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here