सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा
उमरगा: ग्रामीण भागातील सामान्य जनतेने महात्मा फुले जन आरोग्य योजनेचा फायदा घ्यावा असे आवाहन भाऊसाहेब बिराजदार साखर कारखान्याचे चेअरमन प्रा. सुरेश बिराजदार यांनी कलदेव निंबाळा येथील मोफत आरोग्य शिबिरामध्ये केले. शनिवारी (दि.४) रोजी शेंडगे हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उमरगा आणि ग्रामपंचायत कलदेव निंबाळा यांच्या संयुक्त विद्यमाने सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.dharashivnews
सुरुवातीस सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून प्रा.बिराजदार यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
प्रस्ताविकात डॉ.आर.डी. शेंडगे यांनी उपस्थितांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेची सविस्तर माहिती देत आरोग्य विषयक माहिती देवून मार्गदर्शन केले.
Umrganews /या शिबिरात १४५ रुग्णांची तपासणी करून उपचार करण्यात आले.यातील ३५ रुग्णांना पुढील मोठ्या उपचारासाठी उमरगा येथील शेंडगे हाॅस्पीटलमधे नेण्यात येणार आहे. डॉ.आर. डी शेंडगे, डॉ. सोमनाथ कवठे, डॉ. विशाल पवार ,डॉ. विशाल पवार ,डॉ. मेघा पाटील, आरोग्य अधिकारी,आनंद चव्हाण ,नर्स पुनम मते आदींनी तपासणी केली. यावेळी प्राध्यापक सुरेशदाजी बिराजदार यांना धाराशिव आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला.
Dharashivnews /तसेच गावामधील नव्यानेच नोकरीसाठी निवड झालेल्या शिवराज नंदगावे, लक्ष्मण भंडे, प्रल्हाद जाधव या युवकांचा प्रा.सुरेशदाजी बिराजदार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सामाजिक कार्यकर्ते देविदास पावशेरे यांनी केले.
Umrganews /यावेळी सरपंच महादेव कांबळे, उपसरपंच सुनीता पावशेरे, चेअरमन तुकाराम बिराजदार, तंटामुक्ती अध्यक्ष मल्लिनाथ कारभारी,माजी पोलीस पाटील पांडुरंग पाटील,मधुकर पाटील यांच्यासह नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.








