Umrganews /महात्मा फुले ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार अमोल पाटील यांना जाहीर

0
41

कार्य गौरव पुरस्कार ह.भ.प.शामसुंदर महाराज , प्रा.डाॅ.संजय अस्वले, अधिकारी गौरव पुरस्कार सीईओ मैनाक घोष यांना जाहीर
– – – – – – – –
सूर्या मराठी न्यूज ऋषिकेश सुरवसे उमरगा

Dharashivnews /उमरगा – स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या महात्मा जोतिबा फुले पुरस्कारांची घोषणा महात्मा फुले स्मृतीदिनी करण्यात आली असून यात महात्मा जोतिबा फुले स्मृती कार्य गौरव पुरस्कार सुप्रसिद्ध विचारवंत ह.भ.प.शामसुंदर महाराज सोन्नर आणि प्रा.डाॅ.संजय अस्वले, महात्मा जोतिबा फुले स्मृती अधिकारी गौरव पुरस्कार मुख्य कार्यकारी अधिकारी

(धाराशिव)श्री.मैनाक घोष, महात्मा जोतिबा फुले स्मृती साहित्य पुरस्कार श्री.सुरेंद्र पाटील, महात्मा जोतिबा फुले स्मृती ग्रामीण पत्रकारीता पुरस्कार श्री.अमोल पाटील , महात्मा जोतिबा फुले स्मृती सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार श्री.अमर बिराजदार, महात्मा जोतिबा फुले

स्मृती उद्योजक पुरस्कार श्री.स्वामी ॲग्रो इंजिनिअरींग प्रा.लि.,महात्मा जोतिबा फुले स्मृती शेतकरी पुरस्कार श्री.मनोहर हराळकर, महात्मा जोतिबा फुले स्मृती सरपंच पुरस्कार श्रीम सरोजा बिराजदार ,महात्मा जोतिबा फुले स्मृती शिक्षक पुरस्कार सर्वश्री श्री.अनिल श्रीरसागर ,श्री.लिंबराज कोरे,श्री.प्रविण अगंबरे, श्री.महादेव शिंदे, श्रीम.वनमाला लोखंडे,श्रीम.भावना चौधरी, श्रीम.सुनिता खंडागळे.आदींना जाहीर झाले

असून सदर पुरस्कार प्रदान कार्यक्रम स्मृतीशेष रामलिंगप्पा वैरागकर स्मृतीदिनी अठ्ठावीस डिसेंबर रोजी करण्यात येणार आहे.

Dharashivnews /त्याचबरोबर याप्रसंगी श्री.शामसुंदर महाराज सोन्नर यांचे ‘ संत विचार आणि भारतीय संविधानातील मुल्य ‘ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे श्री.संजय वैरागकर,श्री.सुर्यकांत वैरागकर,श्री.रघुवीर अरणे,श्री.दयानंद पाटील, श्री.गिरीजाकांत वैरागकर , श्रीशैल्य बिराजदार यांनी दिली आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here