आषाढी एकादशी निमित्त अमीर प्रतिष्ठान संचालित के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल, किनगाव च्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ( Yavalnews )

0
1

 

यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे

Yavalnews:आषाढी एकादशीच्या निमित्ताने के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल किनगावमध्ये भव्य आणि भक्तीमय आयोजन करण्यात आले. या प्रसंगी, बाल गोपालांनी विठ्ठल, रुख्मिणी, ज्ञानेश्वर, मुक्ताबाई, सोपान, जनाबाई, अशा अनेक संताच्या वेशभूषा साकारून आणि आकर्षक वस्त्र परिधान करून दिंडीत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.

ए.पी.एस संस्थेचे कार्य अध्यक्ष सचिन तडवी सर व प्राचार्य गणेश मेश्राम सर यांच्या हस्ते दिंडीच्या सुरवातीस पालखी पूजन करून या सोहळ्याची सुरवात करण्यात आली.

स्कूलच्या आवारात विद्यार्थ्यांनी टाळ, लेझिम, पावली, फुगळी खेळून वातावरण भक्तीमय व उत्साहपूर्ण बनवले.

केन्द्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांचे यावल येथे स्वागत सत्कार ( rakshatai khadse )

या प्रसंगी, अमीर प्रतिष्ठानचे कार्य अध्यक्ष सचिन तडवी, प्राचार्य गणेश मेश्राम, संपत बारेला, तायडे मॅडम, महाजन मॅडम, तडवी मॅडम, मेश्राम मॅडम,बारेला मॅडम, साठे मॅडम, जुबेर तडवी, रमण तडवी, अल्ताफ पटेल, राजू कुंभार, खलील तडवी,मुकेश भोई सर्व कर्मचारी वृंद व पालक वर्ग उपस्थित होते.

आषाढी एकादशी निमित्त अमीर प्रतिष्ठान संचालित के.ओ.एम इंग्लिश मीडियम स्कूल, किनगाव च्या विद्यार्थ्यांनी काढली दिंडी ( Yavalnews )

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि धार्मिकता यांचे महत्त्व वाढवण्याचे काम यशस्वीरीत्या झाले.

Yavalnews:आषाढी एकादशीच्या निमित्ताने शाळेत झालेल्या या भक्तीमय सोहळ्याने सर्व उपस्थितांच्या मनात भक्तीचा सागर उभा राहिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here