इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
शेगाव शहर स्वस्त धान्य दुकानातील की पोस्ट मशीन वारंवार बंद पडत असल्याने स्वस्त धान्य दुकानदार यांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन शहरातील स्वस्त धान्य दुकानातील ही पोस्ट मशीन ची समस्या सोडवावी अशी मागणी शेगाव शहर स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन विक्रेता संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत आज शेगाव येथील तहसील कार्यालयात तहसीलदार समाधान सोनवणे यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की सणासुदीच्या दिवसात ई-पाॅस मशीन बंद असल्याने गरजू नागरिकांना आनंदाचा शिधा व शासकीय योजनेअंतर्गत धान्य पुरवठा करण्यात अडचण निर्माण होत आहे त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेऊन इपास मशीन समस्या तत्काळ सोडवावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे निवेदनावर विनोद लांजुळकर, राजहंस ढगे व मंगेश देशमुख बाळू भाऊ पुरी मोहन भाऊ कराळे दीपक दादा ढमाळ विजय भाऊ नामदास भालतडक भाऊ निलेश गणेश मंगेश ढोले , यांच्यासह शेगाव शहर व तालुका स्वस्त धान्य दुकानदारांच्या सह्या आहेत