औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बुधवारी(दि.१४) रोजगार मेळावा

0
147

Akola प्रतिनिधी अशोक भाकरे

अकोला,दि.८(जिमाका)- औद्योगिक प्रशिक्षण संस्था व मे. सुझुकी मोटर्स, गुजरात प्रा.जि. यांच्या संयुक्त विद्यमाने शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,

अकोला येथे बुधवार दि. १४ रोजी विविध पदाकरीता भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये फिटर, टर्नर, वेल्डर, इलेक्ट्रीशियन, डीझेल मॅकेनिक, पेन्टर जनरल, मशिनिस्ट, मोटार मेकॅनिक, टुल ॲन्ड डायमेकर, पी.पी.ओ., ट्रॅक्टर मेकॅनिक,

सि.ओ.ई.ऑटोमोबाईल या व्यवसायातील आयटीआय उत्तिर्ण प्रशिक्षाणार्थ्यांना कंपनीमार्फत रोजगाराची संधी उपलब्ध करुन दिली जाणार आहे. इच्छूक व पात्रताधारक उमेदवारांनी रोजगार मेळाव्यात मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

तसेच अधिक माहितीकरीता मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे संपर्क साधावा, असे आवाहन मुलभूत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र तथा औद्योगिक प्रशिक्षण संस्थाचे अंशकालीन प्राचार्य यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here