यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
किनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात तालुक्यातील चोपडा विधानसभा क्षेत्रातील किनगाव-डांभूर्णी व साकळी-दहीगाव जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांची माजी आमदार प्रा . चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थित बैठक पार पडली. या अभीयान बैठकीत शिवसेनिकांनी आपला सहभाग नोंदवला, शिवसेना शिवसंपर्क अभियान बैठक आज रविवार दिनांक २५/०७/२०२१ रोजी दुपारी २ वाजता किनगाव येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात संपन्न झाली, या शिवसेना शिवसंपर्क अभियान मोहीम अंतर्गत घर तिथं शिवसेनिक व गाव तिथ शाखा हे अभीयान माजी आमदार तथा चोपडा रावेर लोकसभा मतदारसंघाचे सह संपर्क प्रमुख प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या आमदार सौ .लताताई सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात येणार आहे. सदर बैठकीस चोपडा विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्यासह शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख तथा यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तुषार उर्फ मुन्ना पाटील , शिवसेना तालुकाप्रमुख रविन्द्र सोनवणे युवा सेनेचे तालुकाप्रमुख गोटुभाऊ सोनवणे, यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती व शिवसेना आदीवासी सेनेचे तालुकाप्रमुख भारसिंग तेरसिंग बारेला , लिलाधर पाटील , योगेश पाटील , रोहीदास महाजन , किशोर माळी , आडगावचे सरपंच रशीद तडवी , सुर्यभान पाटील , लक्ष्मण बडगुजर यांच्यासह शिवसेनेचे कार्यकर्ते व पदधिकारी यांना पक्षाअंतर्गत संघटना बांधणी व आदी विविध विषयांवर माजी आमदार व प्रा .चंद्रकांत सोनवणे यांनी मार्गदर्शन करण्यात आलीत .
तरी शिवसेनेच्या या शिवसंपर्क अभीयान सर्व शिवसैनिकांनी व शिवसेना पदाधिकारी यांनी बैठकीस प्रामुख्याने उपस्थित राहुन या अभीयानास यशस्वी केले .