कोरपावली गावातील त्या मुन्नाभाई एमबीबीएसचे पुन्हा आगमन बोगस दवाखाना सुरू आरोग्य यंत्रणा कुचकामी

0
1082

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

 

तालुक्यातील आदीवासी गाव म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या कोरपावली गावात तो मुन्नाभाई एमबीबीएस बोगस डॉक्टर पुनश्च सक्रीय झाला असुन , उपचाराच्या नांवाखाली सुरू असलेल्या कारभारास गावातील काही तथा कथित पुढारी व स्थानिक आरोग्य प्रशासनाचे पाठबळ या बोगस डॉक्टरला मिळत असल्याची ग्रामस्थांनी ओरड असुन , वरिष्ठ पातळीवरील आरोग्य प्रशासनाने या प्रश्नाकडे तात्काळ लक्ष देवुन कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे . यावल तालुक्यातील कोरपावली गाव हे आदीवासी गाव म्हणुन ओळखले जाते या गावात गेल्या काही दिवसा पासुन एका बिहारी बोगस डॉक्टराने गेल्या दोन वर्षा पासुन आपला उपचाराचा कारभार सुरू केला असून , उपचाराच्या नावाखाली ग्रामीण क्षेत्रातील गरजु रूग्णाच्या जिवाशी खेळ खेळला जात असुन , या संदर्भात यावल तालुका डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातुन अशा बोगस व्यवसायीक डॉक्टरांबद्दल तक्रारी करण्यात आल्या होत्या यानंतर तालुका आरोग्य अधिकारी डॉ गफूर तडवी यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातुन कार्यवाही करीत त्याच्या कडील असलेली कागदपत्रे चौकशी कामी जमा केली होती . त्या बोगस डॉक्टरास चौकशी अहवाल मिळे पर्यंत आपला दवाखाना बंद ठेवावा अशा सुचना देण्यात आल्या होत्या . सदरच्या या बोगस डॉक्टरचा दवाखाना बंद पाडला होता , मात्र काही दिवस हा बोगस डॉक्टर बाहेरगावी निघुन गेल्यानंतर तो पुन्हा कोरपावली गावात दाखल झाला असुन , त्याने पुनश्च आपला दवाखाना सुरू केला असुन , अशा बोगस डॉक्टरांवर आरोग्य यंत्रणेचे नियंत्रण नसल्याचे दिसुन येत असुन, अशा प्रकारे बोगस डॉक्टरांच्या चुकीच्या उपचार पद्दतीने रुग्णांच्या संदर्भात काही अप्रीय घटना घडल्यास व रुग्ण दगावल्यास यास जबाबदार कोण असा प्रश्न सुज्ञ ग्रामस्थामध्ये उपस्थित होत आहे . या संदर्भात सावखेडा सिम तालुका यावल प्राथमिक आरोग्य केन्द्र आणी ग्रामपंचायतीने तात्काळ संयुक्त कार्यवाही करून त्या बोगस डॉक्टरला पाठींबा देणाऱ्यांना समज देवुन त्या बोगस डॉक्टरचे दुकान कायमचे बंद करावीत अशी मागणी करण्यात येत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here