खा. प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी

0
613

 

पक्षविरोधी कारवाई केल्यामुळे अन्य सात जणांवर कारवाई…

बुलडाणा :- जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख पदावरून खासदार प्रतापराव जाधव यांनी पक्षविरोधी कारवाई केल्या मुळे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवेसना जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातुन प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. या बाबत चे वृत्त आज रविवार दिनांक 24 जुलै 2022 रोजी शिवसेनेचे अधिकृत मुखपत्र असलेल्या दैनिक सामना मधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 19 जुलै 2022 रोजी शिवसेनेच्या 12 खासदाररांनी गट तयार करून 12 खासदाराचें पत्र लोकसभा सभापतींना देऊन त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला पाठींबा दिला होता.
त्यांनी शिंदे गटाला पाठींबा जिल्ह्यातील घाटाखालील काही शिवसेना पदाधिकारी यांनी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा प्रमुख शांताराम दाणे यांनी आम्ही खासदार प्रतापराव जाधव यांच्या सोबत असल्याचे जाहीर केले होते. सामना मध्यवर्ती कार्यालयातुन प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात जिल्हा संपर्क प्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांची जिल्हा संपर्क प्रमुख पदावरून तर जिल्हा प्रमुख शांताराम दाणे (मलकापूर जळगांव जामोद विधानसभा) उपजिल्हा प्रमुख राजु मिरगे, उपजिल्हा प्रमुख संजय अवताडे, तालुका प्रमुख नांदुरा संतोष डीवरे, तालुका प्रमुख मलकापूर विजय साठे, तालुका प्रमुख शेगांव रामा थारकार यांची पक्ष विरोधी कारवाई केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेतुन हकालपट्टी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here