इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी
जळगांव ते वैष्णवगड झालेल्या कामामध्ये कोणत्याही पॅचेस मध्ये ४० एम. एम. गिट्टी व डांबर टाकून पॅचेस भरलेले नाही रोलींग केलेले नसून बि.बी.एम. कारमेट काम (वरील कोट) केला आहे. सदर कामामध्ये आज पुर्ण पॅचेस उखळून गेलेले आहे व आता वैष्णवगड ते सावखेड तेजन फाट्यापर्यंत काम झाले व ते पण निकृष्ठ दर्जाचे आहे. सोलींगच्या खाली न झाडता डांबर न टाकता सोलींगच्या वरून डांबर टाकून त्यावर कारपेट बि.बि.एम.चा कोट टाकला त्यामध्ये जे डांबर वापरले ते कमी प्रमाणात
आहे असा आरोप सरपंच व गावकऱ्यांचा असल्याने त्यांनी
पहिले निवेदन ४ जुलै रोजी उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगांव राजा यांच्याकडे लेखी विनंती अर्ज देऊन सुध्दा कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. तसेच सदर काम हे कॉलीटी कंट्रोलची तपासणी करून हे काम पुन्हा नव्याने जळगांव ते सावखेड तेजन फाट्यापर्यंत रोडचे पुर्ण पॅचेस भरून दोन कोट टाकून काम नव्याने करून देण्यात यावी अशी मागणी करून सुध्दा आमची मागणी पूर्ण केली नाही.
या मुळे सरपंचासह गावकरी तहसिल कार्यालया समोर दिनांक ३०/९/२०२३ रोजी उपोषणास बसत आहोत. सदर उपोषणा दरम्यान आमचे जिवाचे काही बरे वाईट झाल्यास त्यास संबंधीत अधिकारी व कर्मचारी हेच जबाबदार राहतील अशी मागणी तहसीलदाराकडे निवेदनाव्दारे केली आहे त्यांच्या प्रमुख मागण्या सविस्तर
जळगांव ते सावखेड तेजन फाट्यापर्यंत रोडचे पुर्ण पॅचेस भरून पुन्हा दोन कोट टाकून काम नव्याने करून देण्यात यावे.
सदर कामाची गुणवत्ता चाचणी करून सबंधीत ठेकेदाराचे नाव काळ्या यादीरत टाकून बोगस कामास प्रोत्साहन देणाऱ्या J.E. व उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, देऊळगांव राजा यांच्यावर कारवाई करण्यात यावी. सदर काम आमच्या मागणीनुसार पूर्ण होत नाही तोपर्यंत कामाचे देयक देण्यात येऊ नये. अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार सिंदखेडराजा यांच्याकडे केली आहे.