डीपी पथकाने भूमि अभिलेख कार्यालय येथून शासकीय लॅपटॉप चोरी करणाऱ्याला केली अटक

0
481

 

सचिन वाघे जिल्हा प्रतिनिधी

हिंगणघाट :- 29 ऑक्टोंबर
दि 19 सप्टेंबर चे दुपारी 4 ते 5 वा. दरम्याण फिर्यादी ही भुमी अभिलेख कार्यालय, हिंगणघाट येथे त्यांचे जवळील डेल कंपनीचे शासकिय लॅपटॉपवर काम करीत असता, कोणीतरी अज्ञात चोराने त्यांचे कार्यालयातून शासकिय लॅपटॉप चोरून नेल्याचे तक्रारी वरून पोस्टे ला अपराध क्र. 1002/2022 कलम 380 भादंवि प्रमाणे गुन्हा नोंद .
सदर गुन्हा दाखल होताच पो. स्टे हिंगणघाट येथील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रथक प्रमुख पो. हवा. शेखर डोंगरे व त्यांचे पथक लॅपटॉप चोरी गेल्या पासुन पो. स्टे. हद्दीमध्ये शोध घेत असता, त्यांना दिनांक 27 ऑक्टोंबर रोजी मुखबीर कडून मिळालेल्या माहितीवरून संशईत आरोपी नामे अशोक गोविंदराव भगत, वय 58 वर्ष, रा. विर भगतसिंग वार्ड, हिंगणघाट यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता, त्याने सदरचा लॅपटॉप चोरी केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातुन एक डेल कंपनीचा लॅपटॉप कि. 45,000 रू. चा हस्तगत केला.
सदरची कामगीरी मा. श्री. नुरूल हसन, पोलीस अधीक्षक, मा. श्री. यशवंत सोळंके, अपर पोलीस अधीक्षक, वर्धा, मा. श्री. पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट, पो.नि. श्री. कैलास पुंडकर, पोलीस स्टेशन, हिंगणघाट यांचे मार्गदर्शनात डि. बी. पथकाचे पो.हवा. शेखर डोंगरे, नापोशि. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विशाल बंगाले, पोशि सचिन भारशंकर यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here