हिंगणघाट तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील दारोडा बसस्थानक परिसरातील पुला जवळ आज शुक्रवारी ९ सप्टेंबरला अज्ञात वाहनाने दुचाकी जबर धडक दिली या भिषण धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून मृत्यक व्यक्तीचे नाव सुनिल भगत राहणार वडनेर आहे. मिळालेल्या माहितीनुसार मृत्यू सुनिल भगत हे हिंगणघाट शहरातील गिमा टेक्सटाइल मध्ये काम करीत आहे.डिवटी संपल्यानंतर ते आपल्या वडनेर गावाकडे परत जात असताना राष्ट्रीय महामार्गावरील दारोडा गावातील बसस्थानक परिसरातील पुलाजवळ भरधाव वेगाने जात असलेल्या अज्ञात वाहनाने सुनिलच्या दुचाकी जबर धडक दिली या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच वडनेर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास पोलीस करीत आहे.