फॉरेस्ट परिसरात घुसल्या मोजावी लागेल मोठी रक्कम , २५ शेळ्या आणि १४० मेंड्यासह १लाख ४० हजाराचा दंड ; वनपरिक्षेत्र अधिकारी ऍकेशन मोडवर मेंढपळणाचे धाबे दणाणले

0
479

 

___________________________
सोनाळा :सातपुडा पर्वतात अंबाबरवा अभयारण्य आहे .हे कोअरक्षेत्र आहे.या प्रतिबंधात्मक क्षेत्रात पिंगळी येथील मेंढपाळाच्या१४०मेंढ्या व २५बकऱ्या
अवैधरित्या चराई करित असतांना वन्यजीव विभागाने पकडल्या .ताब्यातील ४ मेंढपाळां कडून वन्यजीव विभागने १लाख४०हजारां चा दंड ४ सप्टेंबर रोजी वसुल केला आहे .यामूळे मेंढपाळांचे धाबे दणाणले आहे . डिएफओ नवलकिशोर रेड्डी व एसीएफ कमलेश पाटील यांच्या नेतृत्वात सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे व वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांनी ही धाडसी कार्यवाही केली आहे .महिनाभरात ही मेंढपाळावर दुसर्‍यांदा ही कार्यवाही करण्यात आली आहे .याबाबत अधिक असे की , अंबाबरवा अभयारण्याच्या सोनबर्डी वर्तुळातील पिंगळी बीट च्या खंड क्रमांक४५४ मध्य पीरबाबा परिसरात विशेष व्याघ्र संरक्षण दलाच्या गस्तीदरम्यान एसटीपीएफ कर्मचाऱ्यांना शेळ्या मेंढ्यांचे कळप अवैधरित्या चरत असल्याचे दिसून आले.वन्यजीव विभागाच्या कर्मचाऱ्यांनी अभयारण्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्रात अवैद्यरित्या चरत असलेल्या १४० मेंढ्या २५ शेळ्यांना जप्त केले. सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयात या प्रकरणी वनगुन्हा दाखल करण्यात आला आहे .
४ मेंढपाळ अनिल डोमाळे, गोपाल मोरे, सोनाजी डोमाळे, हरि डोमाळे सर्व रा. पिंगळी यांना ताब्यात घेण्यात येवून दंड भरण्याच्या अटीवर सोडून देण्यात आले . तदनंतर ४ सप्टेंबर रोजी दुपारी ५ वाजता सोनाळा वनपरिक्षेत्र कार्यालयात उपरोक्त दंड भरल्याने जप्त मेंढ्या वनपाळांना ताब्यात देण्यात आल्या . अशी माहिती आरएफओ वाकोडे यांनी दिली . यापुर्वीसूध्दा५ऑगस्टला वनविभागाने१५० मेंढ्या जप्त केल्या होत्या.उपरोक्त कारवाईत विशेष व्याघ्र संरक्षण दलाचे१कर्मचारी,२वनपाल,१५ वनरक्षकां सह २५वनमजूरांचा समावेश होता ..तर जप्त केलेल्या मेंढ्या वनविभागाच्या ताब्यात असून मांगेरी नाक्यावर वनविभागाच्या ताब्यात होत्या ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here