वडनेर — गांगापूर येथील विद्युत ट्रान्सफॉर्मर 20-25 दिवसापासून जाळले होते वारंवार सूचना देवूनही विद्युत वितरण कंपनी कानाडोळा करीत होते त्यामुळे गावातील नळ बंद होते व पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती चालू झाली होती.ही बाब तालुका संघटक जयंता कातरकर यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी वीज वितरण कंपनीला नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्या संदर्भात निवेदन दिले व दोन दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देताच एकच दिवसात नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले व आज नळ योजनेची लाईन चालू होवून नळाला पाणी बघताच गावकऱ्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही.सर्व गावकऱ्यांनी जयंता कातरकार यांचे आभार मानले.मनसे नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरून प्रयत्न करीत आहे.
सुर्या मराठी न्युज साठी सचिन वाघे वर्धा