तुकाराम राठोड,जालना
प्रतिनिधी:(जालना) दि.22 सप्टेंबर 2022 रोजी
भारत सरकारचे रेल्वे,कोळसा आणि खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्या नवीन आष्टी-अहमदनगर नवीन रेल्वे मार्गाचे उद्घाटन होणार आहे. तसेच नवीन आष्टी-अहमदनगर डेमू सेवेच्या उद्घाटनाच्या सेवेला हे मान्यवर दि.23.09.2022 रोजी हिरवा झेंडा दाखवतील.
या प्रसंगी ना.राधाकृष्ण विखे पाटील,श्रीमती पंकजा मुंडे,श्रीमती रोहिणी शेंडगे,डॉ. प्रीतम मुंडे,डॉ.सुजय विखे पाटील,श्रीमती रजनी पाटील यांच्यासह आ.धनंजय मुंडे,बाळासाहेब आजबे,संग्राम जगताप,नमिता मुंदडा,संदिप क्षीरसागर,प्रकाश सोळंके,लक्ष्मण पवार,सुरेश धस,विक्रम काळे,सतीश चव्हाण,पल्लवी धोंडे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत,तसेच इतर मान्यवरांना ही निमंत्रित करण्यात आले आहे.
पार्श्वभूमी आणि फायदे:
*66 किमी नवीन आष्टी-अहमदनगर ब्रॉडगेज लाईन 261 किमी अहमदनगर – बीड- परळी वैजनाथ नवीन ब्रॉडगेज लाईन प्रकल्पाचा एक भाग आहे. ज्यामध्ये भारत सरकार आणि राज्य सरकार यांच्यात 50-50 खर्चाचा वाटा आहे.
• डेमू सेवा नवीन आष्टी – अहमदनगर पट्ट्यातील रहिवाशांना आणि जवळपासच्या भागातील रहिवाशांना उत्तम कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल.
• यामुळे स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळेल आणि त्यामुळे मराठवाडा क्षेत्राच्या सामाजिक – आर्थिक विकासाला चालना मिळेल.
• डेमू ट्रेन अहमदनगरहून सकाळी 07.45 वाजता सुटेल आणि न्यू आष्टीला सकाळी 10.30 वाजता पोहोचेल आणि परतीच्या प्रवासात न्यू आष्टी येथून सकाळी 11.00 वाजता सुटेल आणि दुपारी 1.55 वाजता अहमदनगर येथे पोहोचेल.ही गाडी रविवार वगळता दररोज धावणार आहे.
• कडा,नवीन धानोरा,सोलापूरवाडी,नवीन लोणी आणि नारायणडोहो येथे थांबेल.