नितीन सिरसागर हिंगणघाट यांची पुतणी
“आदिती दीपक ताजने” या 2 वर्षाच्या चिमुकलीसाठी मदतीचे आवाहन केले आहे. आदिती १५-०४-२०२२ या दिवशी खेळत असताना आग लागल्यामुळे ती ६४% जळाली/भाजली गेली आहे. तिला किंगस्वे हॉस्पिटल नागपूर येथे भरती करण्यात आले आहे आत्तापर्यंत तिच्या हॉस्पिटलचा खर्च ४ लाख इतका झाला आहे आणि पुढील उपचारासाठी तब्बल ७ लाख इतका खर्च आहे. तिचा किंगस्वे हॉस्पिटल नागपूर पी आय सी यु विभागांमध्ये उपचार चालू असून तिच्या आई-वडिलांची परिस्तिथी बिकट असल्याने तिच्या उपचारासाठी मदतीचे आवाहन करण्यात येत आहे. बाळासाठी मदत करण्यासाठी पुढे यावे असे त्यांनी म्हटले आहे.
तरी सर्वांना विनंती करण्यात येत आहे की सर्वांनी या चिमुकलीसाठी होईल तितकी मदत करावी.
नितीन सिरसागर हिंगणघाट फोन पे नंबर वर मदत करावी – 9960590753..
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे वर्धा