सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )
चिखली तालुक्यातील अंत्रि खेडेकर येथे एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याची घटना दिनांकदिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 8.30मिनिटांनी घडली यामुळे अचानक आलेल्या भटक्या पिसाळलेल्या कुत्र्याने पाच जणांना चावा घेतल्याची घटना घडली !सकाळी विजय अश्रुबा मोरे हे शाळेवरती जात असताना समोरून आलेल्या कुत्र्याने त्यांच्या हाताला चावा घेतला ।यानंतर पिसाळलेल्या कुत्र्याने रवी गवई । साहिल खेडेकर तसेच श्री कंकाळ यांच्या घरी आलेल्या पाहुण्याला सुद्धा चावा घेतला व बाहेर बांधल्या बकरीला सुद्धा पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला ‘यामुळे संपूर्ण अंत्रि खेडेकर गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते ‘जखमी झालेल्या लोकांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र अंत्रि खेडेकर येथे नेण्यात आले व त्यांना रेबीज चे इंजेक्शन देण्यात आले !पुढील उपचाराकरिता त्यांना बुलढाणा येथील सरकारी दवाखान्या मध्ये पाठवण्यात आल्याचे समजते ‘नंतर पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारण्यात आले ।त्यामुळे लोकांनी व लहान लहान मुलांनी सुटकेचा निश्वास टाकला तरी भटक्या कुत्र्याला आवर घालण्याची गरज यानिमित्ताने निर्माण झाली आहे !