अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात उजळणी प्रशिक्षण शिबिर संपन्न..

 

उजळणी प्रशिक्षण शिबिर हे अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात घेण्याची मान्यता द्यावी .. (संगीता इंगळे ता.समादेशक)

प्रतिनिधी.अशोक भाकरे

अकोला होमगार्ड जिल्हा समादेशक मोनिका राऊत यांच्या आदेशावरून प्रशासकीय अधिकारी शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित पुरुष होमगार्ड चे उजळणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले.

अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात पुरुषांचे उजळणी प्रशिक्षण शिबिर क्रमांक ०७/१०/०२२ दिनांक ८ डिसेंबर ते १६ डिसेंबर या कालावधीमध्ये घेण्यात आले होते. शिबिरामध्ये, कवायत, शस्त्र कवायत,पदकवायत उजळणी प्रशिक्षण घेन्यात आले.शिबीराकरीता पातुर,अकोला, अकोट, बाळापूर, मुर्तिजापूर येथील सैनिकांनी सहभाग घेतला होता.उजळणी प्रशिक्षण शिबिराच्या समारोपीय कार्यक्रमा चे आयोजन १६ डिसेंबर रोजी करण्यात आले होते .यावेळी समारोपिय कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासकीय अधिकारी शेख हे होते तर मार्गदर्शक प्र.केंद्र नायक शेळके, तसेच प्र.सा.सु.जयस्वाल, अभिषेक देशमुख,समादेशक सुरेश नाठे अकोट,समादेशक राजु खडसे,यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या कार्यक्रमांमध्ये माजी. होमगार्ड म्हसने यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमामधे प्र.अधीकारी शेख,प्र.केंद्र नायक शेळके,समादेशक संगीता इंगळे यांनी मनोगत व्यक्त केले. उजळणी प्रशिक्षण शिबिर हे होमगार्ड जिल्हा कार्यालयात संपन्न झाले.त्यामुळे शिबीर प्रशिक्षणार्थी अत्यंत खुश व आनंदात होते.
संगीता इंगळे सह पाचही समादेशकांनी पुढील होणारे उजळणी प्रशिक्षण शिबिर हे अकोला होमगार्ड जिल्हा कार्यालयात घेण्याची विनंती केली. होमगार्ड जिल्हा कार्यालयातील आठ दिवसाचे पुरुष उजळणी प्रशिक्षण शिबिर अत्यंत उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन समादेशक राजू खडसे यांनी केले.

Leave a Comment