Home Breaking News अकोल्यातील गांजा तस्करी कनेक्शन टूनकीत?

अकोल्यातील गांजा तस्करी कनेक्शन टूनकीत?

549
0

 

अकोला गुन्हे शाखेने मोठ्या पहाटे एकाला घेतले ताब्यात

सोनाळा पोलिस स्टेशनच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह

अकोला जिल्ह्यातील अकोट ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील आडगाव खुर्द व हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरवा या दोन ठिकाणी नूकतीच गांजा तस्करी वर कारवाई करण्यात आली होती. हि कारवाई अकोला येथील स्थानिक गुन्हे शाखेने केली असून यात तब्बल १ क्विंटल ४६ किलो गांजा जप्त करून दोन आरोपींना अटक केली होती. आता अकोला पोलिसांनी संग्रामपूर तालुक्याकडे मोर्चा वळवला आहे. रविवारच्या पहाटे ४ वाजता दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील टूनकी येथील एका व्यक्तीला गांजा तस्करीच्या संशयात अकोला गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्याने सर्वत्र खळबळ उडाली. अकोला स्थानिक गुन्हे शाखेकडून प्राप्त माहितीनुसार टुनकी येथील एकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे संग्रामपूर तालुक्यात उलटसुलट चर्चांना वेग आला आहे. टूनकी हे गाव सोनाळा पोलिस स्टेशन हद्दीत येत असून याबाबत सोनाळा पोलिस अजूनही गाफील आहे. अकोल्यातील गांजा तस्करी कनेक्शन ग्राम टूनकी तर नाही ना असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. अकोला गुन्हेशाखेने सोनाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत येऊन स्थानिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून एकाला ताब्यात घेतले. याची भनक सोनाळा पोलीसांना नसून पोलीस स्टेशनला नोंदही करण्यात आली नाही. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या या कारवाईमुळे सोनाळा पोलीस स्टेशनच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अकोला गुन्हे शाखेच्या पथकाने अकोट पोलिस स्टेशन हद्दीतील अडगाव खुर्द येथे राजू सोळंके याच्या घरातून ४० किलो गांजा कैलास पवार व राजू सोळंके या दोघांच्या मालकीचा जप्त केला होता. त्यानंतर दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील बोरवा येथील शत्रुघन चव्हाण त्याच्या घरातून तब्बल १ क्विंटल ६ किलो गांजा जप्त केला. या दोन कारवाई मध्ये अकोला स्थानिक गुन्हे शाखेने २३ लाख ३६ हजार रुपये किमतीचा १ क्विंटल ४६ किलो गांजा जप्त केला होता. याप्रकरणी अडगाव खुर्द येथील राजू सोळंके व वारी हनुमान येथील कैलास पवार या दोघांना अटक करण्यात आली तर बोरवा येथील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला होता. मात्र रविवारी अकोला स्थानिक गुन्हे शाखेने संग्रामपूर तालुक्यातील टुनकी येथील एकाला ताब्यात घेतल्याने स्थानिक पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संग्रामपूर तालुक्यात गांजा तस्करीचा मोठा रॅकेट सक्रिय तर नाही ना असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिस स्टेशन हद्दीत अवैद्य धंद्यांचा बोलबोला

सोनाळा पोलिस स्टेशन नेहमीच अंतर्गत वादातून सुप्रसिद्ध आहे. येथील प्रभारी ठाणेदार अमर चोरे याची पोलिस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांसह अवैद्य धंदे करणाऱ्यांवर वचक नसल्याने हद्दीत अवैद्य दारू, वरली मटका, अवैध वाळू वाहतूकीला उद आला आहे. काही दिवस अगोदर पोलिस स्टेशन मधील एका कर्मचाऱ्याने टूनकी येथे गांज्याच्या पूड्या पकडल्या होत्या. मात्र पुड्या विकणाऱ्या सोबत आर्थिक व्यवहार करून प्रकरण रफादफा केले होते. गांजा पकडल्याची चर्चा वाऱ्यासारखी पसरल्याने त्या कर्मचाऱ्याने अवैद्य दारू वर धाड टाकण्यासाठी आलो असता काहीच सापडले नसल्याचा बनाव करीत वेळ मारून नेली होती. आंधळं दळते कूत्रं पिठ खाते असा कारभार सोनाळा पोलिस स्टेशनचा सुरू आहे. याकडे नव्याने कर्तव्यावर रुजू झालेले कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची गरज आहे

Previous articleजळगाव जामोद येथे समाज कल्याण विभागा मार्फत 100 % अनुदानावर गटई स्टॉल वाटप
Next articleवैजापुर गंगापुर विधानसभा मतदार संघातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिंकाचे पंचनामे करा – राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here