अट्रावलच्या कल्पेश शिरसाळेची UAEदुबई येथे होणाऱ्या अंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धच्या सामन्यासाठी अष्टपैलू खेळाडु म्हणुन निवड

 

 

यावल ( प्रतिनिधि )विकी वानखेडे

आदीवासी क्षेत्र म्हणुन जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील अट्रावल या अगदी छोटयाशा गावातुन जन्मास आलेल्या कल्पेश शिरसाळे या उदयमुख तरूण क्रिकेटच्या अष्टपैलु खिलाडीची अंतराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धसाठी निवड झाली आहे . अट्रावल तालुका यावल येथील रहीवासी असलेल्या कल्पेश नारायण क्षिरसाळे हा फैजपुर येथील डीएन कॉलेज मधील मराठी एमएचा विद्यार्थी असुन , मध्यवर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या कल्पेश यास लहाणपणा पासुनच क्रिकेट खेळण्याचा छंद होता , अट्रावल सारख्या गावात अतिश्य प्रतिकुल परिस्थितीत कल्पेश याने अंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धपर्यंत भरारी घेतली आहे . दिनांक ८ ऑक्टोबर २०२२ पासुन UAE दुबई येथे सुरू होणाऱ्या अंतरराष्ट्रीय लिग क्रिकेट स्पर्धसाठी क्लपेश शिरसाळे याची INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ निवड करण्यात आली असुन या संघात निवड झालेला तो महाराष्ट्र राज्यातुन कल्पेश हा एकमेव खेळाडु आहे , नुकत्याच ( राजस्थाव ) येथे झालेल्या अंतरराज्य क्रिकेट स्पर्धतील सराव सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते , या सराव सामन्यांमध्ये देशातील सुमारे ५००च्या वर क्रिकेटच्या खेळाडूंनी यात भाग घेतला होता यापैक्की संपुर्ण देशातुन ३० खेळाडुंची निवड झाली त्यात महाराष्ट्र राज्यातुन कल्पेश शिरसाळे हा एकमेव खेळाडू असुन या INCL इंडीयन नॅशनल क्रिकेट संघ, मुंबईच्या निवडी झालेल्या प्रशिक्षणार्थ घेण्यात आलेल्या सराव सामाऱ्यात कल्पेश यांने केलेल्या अष्टपैलू कामगीरीमुळे त्याची ही निवड करण्यात आली आहे या सामन्यासाठी प्रशिक्षक म्हणुन सलाह काजी व मधुसर यांचे मार्गदर्शन त्यास लाभले . आदीवासी ग्रामीण क्षेत्रातील छोटयाशा गावात जन्माला आलेल्या या खेळाडुच्या अंतरराष्ट्रीय लिगच्या क्रिकेट सामान्यांसाठी संघात निवड झाल्या बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे .8ई

Leave a Comment