अतिवृष्टिच हाहाकार , सर्व सामान्यावर वार , परिस्तिति असली दक्ष तरी प्रशासनाच्या मदतीकडेच लक्ष

 

ढगफुटी सदृष्य पाऊसाने संग्रामपुर तालुक्यातील सर्व सामान्य माणसापासून तर शेतकरी, शेतमजूर यांचे अतोनात नुकसान झाले.आज सकाळी सर्वात अगोदर पातुर्डा बु येथील प्रयोगशील शेतकरी श्री भाष्करकाका चिकारे यांच्या शेतातील नुकसान पाहणी केली.दुर्गादैत्य व वानखेड ला जोडणारा पुल वाहुन वानखेड गावचा संपर्क तुटला, संबंधित विभागाशी संपर्क करुन येण्याजाण्यासाठी भराव टाकून तातडीने सुरू करा अशी मागणी केली.

 

अमोल मोहोड यांची किराणा दुकान

या पुला जवळच श्री नानाभाऊ भोजने यांच घर संपूर्ण वाहुन गेले त्यांना तात्काळ धान्यांची व्यवस्था करुन देण्याच्या शासनाच्या आदेशाचे पालन करत ग्राम सेवक श्री धनावडे व ग्रा पं सदस्य यांनी अंमलबजावणी केली

.वरवट बकाल येथील कृ उ बाजार समितीच्या आवारात नाल्याचे पाणी घुसून व्यापारी व शेतकरी यांच्या मालाचे नुकसान झाले त्याची पाहणी केली याच वेळी कृ उ बाजार समितीच्या भाड्याने दिलेल्या दुकानात पाणी शिरुन तेथील व्यावसायिक श्री नितीन हागे यांच्या कृषी केंन्द्राचे,श्री शिवदास गोल्हर यांच्या इलेक्ट्रॉनिक्स दुकानाचे तर रेडीमेड कापड दुकानदारांचे नुकसानाची पाहणी करत श्री काशीरामजी ढगे यांच्या शेतात जाऊन शेती पिकाची पाहणी

केली.वरवट बकाल येथील शेतकऱ्यांची जनावरे दगावली त्यांजी उत्तर तपासणी पशुसंवर्धन अधिकारी यांनी अहवाल बनवल्याची खात्री करून घेतली.येथुन बावनबीर येथील खुप मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली.एकलारा येथील शेतकरी श्री मदनभाऊ धुळे यांचा आलेल्या पुराचा अंदाज न आल्यामुळे मृत्यू झाला.त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना भेटुन सांत्वन करण्याचा प्रयत्न केला

.संबधित कुटुंबाला तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.एकलारा गावातीलच पुराचे पाणी घुसलेल्या घराची पाहणी केली यावेळी सरपंच, ग्राम सेवक उपस्थित होते.यानंतर आकोली येथेही खुप मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीची पाहणी केली.आमचे बंधु श्री अमोल मोहोड पाटील यांच्यी किराणा दुकान,पिठ गिरणी वाहुन गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना धीर देत आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या सोबत असल्याचा विश्वास दिला.

आकोली येथीलच एक वयोवृद्ध महिला आपल्या घरातील संपूर्ण वाहुन गेलेल्या सामानाची पाहणी करत असतांनाची आजीच्या डोळ्यातून अश्रूंमुळे उपस्थितांची डोळे पाणावले होते.

येथुन सरळ तहसील कार्यालय गाठुन मा तहसीलदार साहेबांना तालुक्यातील नुकसानीची माहिती दिली,मा कर्तव्यदक्ष आमदार डॉ श्री संजुभाऊ कुटे यांनीही तात्काळ नुकसानाची पाहणी करण्याचे आदेश देण्याच्या सूचना दिल्या.

यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्री जानरावजी देशमुख, सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष मा जि प सदस्य श्री राजुभाऊ ठाकरे, किसान आघाडीचे तालुकाध्यक्ष श्री श्रीकृष्णजी भालतिडक महाराज, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष श्री पवनभाऊ अस्वार श्री संजुभाऊ ठाकरे, श्री अविनाश धर्माळ,श्री शोहेब भाई उपस्थित होते.

Leave a Comment