अनाथ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना अन्नदान करत केले पितृपूजन

 

झंवर परिवाराचा माऊली वारकरी संस्थेत अनोखा पितृपूजन सोहळा संपन्न

प्रतिनिधी:सागर जैवाळ

 

सिल्लोड-सिल्लोड येथील प्रसिद्ध व्यापारी पूजा मेडिकल व पूजा फार्माचे सर्वेसर्वा जगन्नाथ गणपत झंवर यांनी अनाथ,आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना तसेच वारकरी मुलांना माऊली वारकरी शिक्षण संस्था निल्लोड फाटा येथे महापंगत देत अनोखे पितृपूजन साजरे केले.प्रारंभी जगन्नाथ झंवर यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठल रुख्मिनी मातेस दुग्धभिषेक संपन्न झाला.तसेच गोमातेचे पूजन करण्यात आले. यावेळी सिल्लोड नगरपालिकेचे नगरसेवक तथा जगन्नाथ झंवर यांचे पुत्र मनोज झंवर, योगेश झंवर, शैलेश झंवर व सर्व झंवर कुटुंबीय उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी नगरसेवक तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत क्षीरसागर,सिल्लोड तालुका व्यापारी संघटनेचे तालुकाध्यक्ष दुर्गेश जैस्वाल यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी प्रशांत क्षीरसागर बोलतांना म्हणाले की ह.भ.प रामेश्वर महाराज यांचे कार्य उल्लेखनीय आहे, अनाथ आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या,व इतर मुलांना वारकरी संस्थेच्या माध्यमातून शिक्षण देणे हे गौरवास्पद आहे. आज झंवर कुटुंबाने अनाथ मुलांसोबत साजरे केलेले पितृपूजन इतरांना आदर्शवत ठरणारे आहे.यावेळी संस्थापक अध्यक्ष रामेश्वर महाराज पवार झंवर परीवाराचे आभार मानताना म्हणाले की माऊली वारकरी संस्था उभी करतांना कथा, कीर्तन,प्रवचनाच्या माध्यमातून मिळणारे मानधन संसारासाठी न लावता संस्थेसाठी,संस्थेच्या मुलांसाठी खर्च करायचे असे ठरवले होते. आज बारा वर्षापासून यात खंड पडला नाही. कोरोना संकटामुळे लेकरांचा सांभाळ करतांना अडचणींना सामोरे जाव लागत आहेे.मात्र झंवर परिवाराने दिलेली साथ सदैव समरणात राहील.
यावेळी नगरपालिका सिल्लोड चे नगरसेवक सुधाकर पाटील, राजू गौर,संजय झंवर, डॉ. नितीन झंवर, हर्षराज लॅबचे साळवे व व्यापारी व मित्रपरिवार,शिक्षक किशोर बडक, मुख्याध्यापक के. बी.जैवाळ,व्यवस्थापक गजानन डिगावकर यांची उपस्थित होती.

चौकट

पितृपूजन कार्यकामासाठी उपस्थित असणाऱ्या सर्व व्यापारी व मित्रपरिवार यांनी ऐनवेळी पुढाकार घेत अनाथ,आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना, व वारकरी मुलांना वह्या, पेन, पेन्सिल, तेल पाऊच,टूथ पेस्ट आदी साहित्य भेट देत सेवेचे अनोखे दर्शन घडविले

Leave a Comment