अनिष्ट प्रथा व अनाठायी खर्च न करता स्तुप्त उपक्रम
अंबड प्रतिनिधी : भागवत गावंडे वाढदिवस म्हटला कि घर सजावट,भेटवस्तु,केक व बरेच काही प्रत्येक जण करत असतात.परंतु या अनिष्ट चालिला फाटा देत सामाजिक जाणीवेचे भान ठेवून वाढदिवसानिमित्त अनाथ आश्रम मध्ये फळे,बिस्केट,रजिस्टर,पेन,पेन्सिल व इतर साहित्य वाटप करून समाजासमोर आदर्श ठेवण्याचे कार्य दुधना काळेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश भाऊ हिवाळे यांनी ठेवले आहे.विश्वंभर भांदरगे,अनिल मस्के,निखिल चौधरी यांच्या संकल्पनेतुन हा आगळावेगळा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे.सामाजिक दायीत्व म्हणून आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून पर्यावरण पुरक वातावरणकरता हातभार लावण्याचा हेतुने वाढदिवसानिमित्त अनाठाई खर्च न करता गावामध्ये वृक्षरोपण व दुधना काळेगावातील स्वच्छता मोहीम हाती घेऊन संपूर्ण गाव स्वच्छ केले व अनाथ आश्रम या ठिकाणी मुलांना वह्या,पेन इत्यादी साहित्य वाटप करत दुधना काळेगावातील प्रत्येक मुलांने बॉडी बिल्डर बनावे या करता व्यायाम शाळा चालु करून एक आदर्श पायडा समाजासमोर ठेवला आहे.या समाजापयोगी उपक्रमासाठी गणेश भाऊ हिवाळे यांच्या सोबत देवा ग्रूप चित्रपट संघटना महाराष्ट्र राज्य जालना जिल्हाध्यक्ष विश्वंभर भांदरगे,अनिल मस्के,निखील चौधरी,शाम संकुडे,राजेश मस्के,करण मिसाळ तसेच आश्रमातील शिक्षक वर्ग व गणेश भाऊ हिवाळे मिञमंडळ या सर्वांची उपस्थिती व्होती.