आयुषी दुबे शेगाव
शेगांव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिकणाऱ्या अम्रपाल भिलंगे नामक विद्यार्थ्याला त्याची संस्थेत असलेली मुळ कागड़पत्र हवी होती. तो ती मागण्यांसाठी प्राचर्याकडे गेला असता तेथील महिला प्राचार्या राजश्री पाटिल यांनी त्याला , ” आताच माझ्यासमोर जीव दे , पुन्हा तोंड दाखवू नको व जाउन मुख्यमंत्र्याना सांग ही बाई मला शिव्या देते…! ” अस म्हणून अपमानित केल होत . परवा या घटनेचा व्हिडिओ समाज मध्यमात व्हायरल झाला होता. आज प्रहार संघटनेने शेगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रवेश द्वारासमोर प्राचार्या च्या प्रतीकात्मक पुतल्याची तिरडी बनवून प्रवेशद्वारा समोरा प्राचार्याच्या प्रतिमेच दहन करण्यात आल. यावेळी प्राचार्य राजश्री पाटिल यांच्या विरोधात मोठी घोषणाबाजी करण्यात आली.