Home Breaking News अभिनेता विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियात अटक

अभिनेता विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियात अटक

524
0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

रन चित्रपटातील कौवा बिरयानी फ़ेम अभिनेता विजय राज

गोंदिया ३ : मध्यप्रदेश आणि महाराष्ट्र येथे शेरनी चित्रपटाचे चित्रिकरन सुरु असुन चित्रपटाच्या शूटिंग क्रूमधील महिलेची छेडछाड केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला असून विजय राजला महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी गोंदियाच्या रामनगर पोलीस यांनी अटक केली आहे.
अभिनेत्री विद्या बालनची प्रमुख भूमिका असलेल्या शेरनी या चित्रपटाचे शूटिंग गोंदिया शहरापासून जवळ असलेल्या मध्य प्रदेशातील बालाघाट येथे सुरू आहे. यासाठी चित्रपटाचा क्रू गोंदियातील हॉटेल गेटवेमध्ये गेल्या १५ दिवसांपासून मुक्कामास आहे. यावेळी शूटिंग क्रूमधील ३० वर्षीय महिलेची विजय राजने छेडछाडकेल्याची तक्रार पोलिसात दाखल झाली होती.
शूटिंग क्रूमधील महिलेने दिलेल्या विनयभंगाच्या तक्रारीवरुन रामनगर पोलिसांनी कलम ३५४ (अ,ड) अन्वये गुन्हा दाखल करुन विजय राज याला अटक करण्यात आली आहे.

Previous articleमहावितरणने पंधरा दिवसात आदिवासी भागांमध्ये लाईन चालू करण्याचे स्वप्न दाखवून … कुंभकर्णा सारखे झोपले
Next articleधनगर समाजावर अत्याचाराचे सत्र थांबता थांबेना अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्ट चा गैर फायदा घेऊन सरपंच आणि त्यांचे सर्व कुटुंब धनगर समाजाला शिवीगाळ करून खोटे गुन्हे दाखल करण्याची देत आहेत धमकी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here