Home Breaking News अमरावती हुन किसान रेल साठी ची योजना बनली माननीय नितीन गडकरींच्या उपस्थितीत.

अमरावती हुन किसान रेल साठी ची योजना बनली माननीय नितीन गडकरींच्या उपस्थितीत.

377
0

 

रेल्वे अधिकाऱ्यांच्या सोबत झालेल्या बैठकीत नियोजन. रेल्वे विभागाने दिली मान्यता. शेतकऱ्यांना त्यांचा शेतमालाचे बुकिंग करता यावे या साठी रेल्वे बनवणार वेगळी Dedicated वेबसाईट.

किसान रेल्वे अमरावती हुन तातडीने सुरू करणे व संत्र्या सहित केळी भाजीपाला, रानभाज्या सीता फळे दूध या पदार्थ या साठी पश्चिम विदर्भाच्या विविध केंद्रा वरून या शेतमालाचे बुकिंग सुरू करण्या साठी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी आज मध्य रेल्वेचे डीआरएम श्री. सोमेश कुमार, डीसीएम श्री. कृष्णा पाटील आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. रेल्वे विभागाने या प्रस्तावाला मान्यता दर्शवली आहे.

यासाठी रेल्वे विभागाची केवळ शेतकऱ्यांचा माल देशातील विविध बाजार पेठा मध्ये पोहचविण्यासाठीची रेल्वेचे वेळापत्रकाची माहिती देणारी व त्यात्यावेळी उपलब्ध होणारा शेतमाल बुकिंग करण्यासाठी ची Dedicated वेबसाईट विकसित करणार असून या वेबसाईटवरून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाचे बुकिंग करण्याची सोय असेल व या सर्व बाबींचे नियोजन ताबडतोब करण्यात येईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी माननीय नितीन गडकरींच्या समवेत आयोजित बैठकीत सांगितले.

तसेच संत्र्याचे पीक हाताशी आले असल्याने विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचा माल बांग्लादेशमध्ये कमी वेळ आणि कमी खर्चात निर्यात करण्यासाठी विशेष किसान रेल अमरावती जिल्ह्यातील विविध केंद्रावरून व विदर्भातील विविध केंद्रा वरून सुविधा ताबडतोब उपलब्ध होईल.

पश्चिम विदर्भ विकास परिषदेची अमरावतीतून किसान रेल सुरू करण्याची मागणीला माननीय नितीनजी यांनी केवळ ऐकली नाही तर या मागणीला नियोजनाची जोड देऊन निर्णय होण्यापर्यंत पोहचविले त्याबद्दल पश्चिम विदर्भातील करोडो शेतकरी, शेतमजूर महिला , बेरोजगार व्यापारी उद्योजक व नागरिकांच्या वतीने – दिनेश सूर्यवंशी, अध्यक्ष, पश्चिम विदर्भ विकास परिषद , संयोजक नितीन भुतडा, निमंत्रक गजानन कोल्हे तसेच बुलढाणा जिल्हा – संयोजक – सचिन देशमुख , सतीश गुप्ता , विजय कोठारी , मोहन शर्मा , प्रदिप सांगळे , शाम फापट , तसेच प्रसिद्ध प्रमुख – कैलास देशमुख , नानासाहेब काडलकर , अभिमन्यु भगत , नाना इंगोले तेल्हारा , संतोष जानवे अकोला यांनी आभार मानले आहे.

Previous articleमाजी आमदार अमर काळे कोरोना पॉझिटिव ,,संपर्कात आलेल्यांनी खबरदारी म्हणून कोरोना चाचणी करून घेण्याची केले आवाहन,,,
Next articleमहाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची पातूर तालुका कार्यकारिणीची अविरोध निवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here