अमृत महोत्सव वर्षात रस्ता होईल का? गोळेगाव खुर्द प्लाट वासियांची आराधना ।

 

 

शेगाव तालुक्या अंतर्गत येत असलेल्या कालखेड गट ग्रामपंचायत मधील गोळेगाव खुर्द प्लाट हे गाव हे गाव मन नदीला आलेल्या 1959 मधील महापुरामुळे पुनर्वशीत झालेले आहे 1959 पासून तर आज 2022 पर्यंत या गावाला अद्यापही पक्का रस्ता झालेला नाही या गावातील नागरिकांना पावसाळ्यामध्ये चिखलामधून दोन किलोमीटर प्रवास करावा लागतो चिमुकल्या मुलांना अंगणवाडी आणि एक ते चार या वर्गातील विद्यार्थ्यांना सुद्धा या चिखलामधून गोळेगाव खुर्द या गावाला शाळेत यावे लागते , आजारी असलेल्या पेशंटला चक्क म्हशीच्या पाठीवर किंवा खाटेवर पेशंटला घेऊन यावे लागते यासंदर्भात वेळोवेळी संबंधित प्रशासनाला माहिती पुरवली आहे व मीडियामध्ये सुध्दा बातम्या प्रकाशित झालेल्या आहेत परंतु अध्यपही या गावाला पक्का रस्ता झालेला नाही 2020 मध्ये पानद रस्ते अंतर्गत या रस्त्याचे माती खोदकाम झालेले आहे परंतु अद्यापही त्यावर कसलेही पद्धतीची खडीकरण झाले नसल्याने हा पानद रस्ता पूर्ववत चिखलमय झालेला आहे या संदर्भात संबंधित गावकऱ्यांनी ग्रामपंचायत कालखेड तसेच तहसील कार्यालय शेगाव पंचायत समिती शेगाव यांना वेळोवेळी सांगून सुद्धा अद्यापही त्यावर खडीकरण झाले नाही या गावाकडे लोकप्रतिनिधी तथा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे।लोकप्रतिनिधी फक्त निवडणुकीच्या वेळेसच या गावाला आपल्या मतांची पोळी भाजण्यासाठी च येत असून कोरडी आश्वासने देऊन जातात। यावर्षी देशाला 75 वर्ष स्वातंत्र्य मिळवून पूर्ण झालेले असून यावर्षी अमृत महोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे ,शासनाकडून अनेक शासकीय प्रलंबित असलेली कामे या अमृत महोत्सवी वर्षात निकाली काढण्यासाठी कॅम्प राबविण्यात येत आहेत अशाच एखादा कॅम्प शासनाकडून ज्या गावांना रस्ते नाहीत ज्या रस्त्याची कामे प्रलंबित आहेत अशासाठी शासनाकडून काही उपाययोजना राबवण्यात येतील का ? असा प्रश्न येथिल रस्त्याअभावी पीडित असलेले ग्रामस्थ करीत आहेत,
गोळेगाव खुर्द प्लांट वासियांना या अमृत महोत्साहाच्या आतुरतेनेच आपल्या गावचा रस्ता या अमृत महोत्सव वर्षात होईल का असा प्रश्न आणि आराधना या गावकऱ्यांकडून होत आहे अमृत महोत्सवात संबंधित प्रशासन या रस्त्याची दखल घेईल का असा प्रश्न गावकऱ्यांकरी करीत आहेत
फोटो
गोळेगाव खुर्द गावातील चिखलमय झालेला पाणंद रस्ता
फोटो
रस्त्या अभावी खाटेवर पेशंटला दवाखान्यात नेताना गावकरी

Leave a Comment