Home Breaking News Kingaonnews/किनगाव प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा! वंचित बहुजन आघाडीच्या ठिय्या आंदोलनाला यश; लेखी...

Kingaonnews/किनगाव प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा! वंचित बहुजन आघाडीच्या ठिय्या आंदोलनाला यश; लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित

 

विकी वानखेडे यावल/जळगाव

यावल : किनगाव प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, तसेच दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यावल पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनादरम्यान आंदोलकांनी प्रशासनाकडे विविध मागण्या मांडत न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. आंदोलनाची दखल घेत संबंधित प्रशासनाकडून मागण्यांबाबत लेखी आश्वासन देण्यात आले.

यावेळी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याबाबतही मागणी करण्यात आली. येत्या पंधरा दिवसांच्या आत यासंदर्भात आवश्यक कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असे लेखी आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याची माहिती आंदोलकांनी दिली.

प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

किनगाव प्रकरणाची निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून पीडितांना न्याय मिळवून द्यावा, तसेच प्रशासनाने दिलेल्या लेखी आश्वासनाची पंधरा दिवसांच्या आत प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली.

आता प्रशासन दिलेल्या लेखी आश्वासनाची कितपत पूर्तता करते, याकडे किनगावसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.