Home Breaking News अल्पवयीन प्रेयसीला पळून नेले, गुन्हा दाखल

अल्पवयीन प्रेयसीला पळून नेले, गुन्हा दाखल

482
0

 

नागपूर : अल्पवयीन प्रेयसीला पळून नेले, ही घटना घडली गुन्हा दाखल प्रियकराने दोन वर्षांच्या प्रेम प्रकरणानंतर प्रेयसीला पळवून नेले. कपिलनगर पोलिसांनी युवकाविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला. विक्की शेंडे (२३, निर्मल कॉलनी, कपिलनगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, म्हाडा कॉलनीत रिया (बदललेले नाव) ही आई, मोठी बहीण आणि लहान भावासह राहते. रियाने नुकतीच बारावी पास केली आहे. तिच्या घराच्या बाजूला विक्कीची आजी राहते. विक्कीचे आजीच्या घरी नेहमीच येणे-जाणे होते. दोघांचे दोन वर्षांपूर्वी सूत जुळले. दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु, रियाच्या आईचा लग्नाला विरोध होता. आज गुरुवारी दुपारी बारा वाजता त्याने रियाला पळवून नेले.
पोलिसांनी विक्कीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

यापूर्वीही काढला होता पळ
रियाची दहावीची परीक्षा होताच दोघांनी घरातून पळ काढला होता. तेव्हा तिच्या आईने जरीपटका पोलिस ठाण्यात विक्कीविरुद्ध तक्रार केली होती. दहा दिवस बाहेर मुक्काम केल्यानंतर विक्कीने रियाला घरी आणून सोडले होते, हे विशेष.

Previous articleधनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांचा रिसोड येथे सत्कार करण्यात आला
Next articleआसलगाव ग्रामपंचायत प्रशासकपदी मोरे रुजू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here