अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्यास अटक

 

प्रतिनिधी अशोक भाकरे

मोरझाडी:पोलीस स्टेशन उरळ ठाणेदार अनंतराव वडतकर साहेब यांना आज दिनांक 19/12/22 रोजी सकाळी 10/30 वाजता
दरम्यान गुप्त बातमीदारा कडून माहिती मिळाली की एक इसम त्याचे मोटरसायकलवर ग्राम लोहाराकडून निंबा फाटाकडे अवैधरित्या दारूची वाहतूक करणार आहे तात्काळ पोलीस स्टाफ सोबत घेऊन निंबा फाटा येथे पोहोचून मिळालेल्या बातमीप्रमाणे संशयित मोटरसायकल चालक नामे उमेश विष्णू भालेराव वय 32 वर्षे राहणार जुना अंदुरा ताब्यात घेऊन त्याच्याकडून कॉलेज बॅग मध्ये McDowell’s no.1, 180 ml 24 बॉटल्स, imperial blue 14 बॉटल्स अशी एकूण 5940 रुपयाची इंग्लिश दारू व टीव्हीएस कंपनीची अपाची गाडी क्रमांक MH30 z 4917 किंमत अंदाजे 50,000/- असा एकूण मुद्देमाल 50,940/- आरोपीकडून जप्त करून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार्यवाही करणारे पथक ठाणेदार अनंतराव वडतकर, पोलीस अंमलदार पद्मसिंग बैस ,सुनील सपकाळ, कांताराम तांबडे

Leave a Comment