असाक्षरता कलंक पुसून काढण्यासाठी समाजपयोगी कार्य करा–चामोर्शी येथील तालुका स्तरीय प्रशिक्षणात प्रतिपादन.

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-दिनांक ९ आक्टोबर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली,शिक्षण विभाग(योजना)यांच्या मार्गदर्शनाखाली गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत केंद्र स्तरीय सुलभकांचे दिनांक ९ आक्टोबर २०२३ ते दिनांक ११ आक्टोबर २०२३ या कालावधीत तालुका स्तरीय प्रशिक्षण गट शिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले आहे.

आज प्रशिक्षणाचा पहिला दिवस होता.उदघाटनिय कार्यक्रमाचे अध्यक्ष गट साधन केंद्र चामोर्शीचे गट समन्वयक चांगदेव सोरते हे होते तर विशेष अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी यशवंत टेंभुर्णे,मुलचेरा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी नेताजी मेश्राम हे होते.

तर प्रमुख पाहुणे केंद्र प्रमुख एम जी वासेकर, प्रशिक्षणाचे तालुका सुलभक विषय साधनव्यक्ती घनश्याम वांढरे,कालिदास डोंगरे,धर्मपूर शाळेचे उपक्रमशील शिक्षक वेणूगोपाल दासरवार,विषय साधनव्यक्ती विवेक केमेकर, फुलोरा समन्वयक प्रविण धुरके,विषय साधनव्यक्ती कु वंदना चलाख हे होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कालिदास डोंगरे यांनी केले. प्रशिक्षणार्थींना पंचायत समिती चामोर्शी येथील शिक्षण विस्तार अधिकारी यशवंत टेंभुर्णे,नेताजी मेश्राम यांनी मौल्यवान मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मार्गदर्शन गटसमन्वयक चांगदेव सोरते यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु सरलक्ष्मी यामसनी मॅडम यांनी केले.

प्रसंगी नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा परिचय, स्वरूप,उदिष्टे,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण,निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान,उजास प्रवेशिका,उल्हास अप्स, स्वयंसेवकांची भुमिका, मुख्याध्यापक व शिक्षकांची भूमिका यावर सविस्तर चर्चा करण्यात आले.

सदर प्रशिक्षणातील नियोजित घटकांचा उलगडा करण्यासाठी गटकार्य व सादरीकरण पद्धतीचा वापर केल्या जात आहे,दिवसभरात तिन्ही सुलभकांनी तणावमुक्त व आनंददायी वातावरणात नाविण्यपूर्ण अध्यापन पद्धतीच्या सहाय्याने मोकळीकतेचा वापर करून प्रशिक्षणार्थी यांना सहाय्य केले.प्रशिक्षणाला चौदा केंद्रातील २७(१ मुख्याध्यापक व १ तंत्रस्नेही शिक्षक) उपस्थित होते.शेवटी ‘वंदे मातरम्’ हे राष्ट्र गाण घेऊन दिवसाची सांगता करण्यात आली.

Leave a Comment