आझाद हिंदच्या आक्रोश मोर्चातील मागणीची पूर्तता.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हा बदलीमुळे पोलीस प्रशासनात खळबळ.

 

अखेर होम डिवायएसपी गिरीश ताथोड आणि उपपोलीस निरीक्षक घोडेस्वारांची जिल्हा बदली.

बुलढाणा: आझाद हिंदच्या वतीने काढलेल्या आक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने अमरावती विभागाचे पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे यांना आझाद हिंद शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने 27 जानेवारी 2023 ला प्रत्यक्ष भेटून तक्रार दाखल केली होती.

सदर तक्रारीच्या अनुषंगाने होम डिवायएसपी गिरीश ताथोड आणि जळगाव जामोद पोस्टेचे उप पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार यांची त्वरित जिल्हा अंतर्गत बदली झाली होती. परंतू आझाद हिंदने जिल्हा बदलीची मागणी केलेली होती. सदर मागणी आझाद हिंदने रेटून धरली होती.

त्यामुळे अमरावती विभागीय पोलीस महानिरीक्षक नाईकनवरे यांच्या आदेशांन्वये तसे पत्र जिल्हा पोलीस प्रशासन आणि जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या वतीने नुकतेच आझाद हिंद संघटनेला प्राप्त झाले आहे.

उपोषणकर्त्या ६७ वर्षीय ज्येष्ठ नागरिक महिलेचा अवमान करने. त्यांना उपोषण मंडपातून केबिनमध्ये बोलवणे. तत्कालीन होमडीवाय एसपी गिरीश ताथोड यांच्या अंगलट आले असुन त्यांची बुलढाणा जिल्ह्यातून ईतर जिल्हात बदली करण्याची आझाद हिंदची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.

त्याचबरोबर अल्पवईन नाबालिक मुलीच्या अपहरण प्रकरणात तपासकामी कूचकामी ठरलेले उप पोलीस निरीक्षक किशोर घोडेस्वार यांचीही जिल्हया बाहेर बदली करण्यात आली आहे.

तसे पत्र १४ आक्टोंबर २०२३ ला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष शेख सईद शेख कदीर यांना प्राप्त झाले आहे.

Leave a Comment