आझाद हिंद महिला संघटनेचा विविध मागण्यासह पीडित मुलीचे अपहरण प्रकरणात न्याय मागण्यासाठी आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकनार

 

बुलढाणा:

शासन प्रशासनाच्या निषेधार्थ राज्यातील जिल्ह्यातील कायदेशीर वरली,मटका, क्लब यांच्या समस्या सोडविणे, नेताजी जयंती पराक्रम दिवस म्हणून साजरी करणे, वृद्ध कलावंत मानधन, जिगाव प्रकल्पग्रस्त, शेतीमालाला भाव, शहरातील रस्त्यांची दुर्दशा,महिला मुलींचे अपहरण, स्वस्त धान्य दुकानदार यासह ज्वलंत समस्यांसाठी आझाद हिंद महिला संघटनेचा आक्रोश निषेध मोर्चा २३ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

पीडित मुलीचे अपहरण प्रकरण आमरन उपोषणा दरम्यान आठ जानेवारीला 22 जानेवारीपर्यंत मागण्यांची पूर्तता न केल्यास शासन प्रशासनाच्या निषेधार्थ 23 जानेवारीला जिल्ह्यातील पीडित माता पिता यांना सोबत घेऊन महिला संघटनेच्या वतीने आक्रोश निषेध मोर्चा काढण्याचा इशारा आझाद हिंद महिला संघटनेच्या वतीने प्रदेश संपर्कप्रमुख सुरेखाताई निकाळजे यांनी दिला होता.

त्यानुसार 23 जानेवारीला दूपारी.१.०० वा. जयस्तंभ चौक स्थीत भारतीय स्वातंत्रता स्मारक (अक्षय वटवृक्ष) येथे देशगौरव नेताजींना अभिवादन करून शहरात शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.

आक्रोश निषेध मोर्चाच्या अनुषंगाने पुढील मागण्यांचे निवेदन शासन प्रशासनाला सादर करण्यात येणार आहे त्यामध्ये नाबालिक मुलीचे अपहरण कर्त्या आरोपींना जेलमध्ये मूलभूत सुख सुविधा प्रदान करणे. नाबालिक मुलीचे अपहरण प्रकरणाचा शोध लावणारे होम डिवाइस पी ताथोड आणि घोडेस्वार साहेब यांचा जाहीर सत्कार करण्याची परवानगी देणे.

देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती पराक्रम दिवस साजरा न करणाऱ्यां शासकीय निमशासकीय कार्यालय संस्थांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करणे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव देणे.जिल्ह्यातील वरली, मटका, क्लब अशा सर्व कायदेशीर सुशिक्षित व्यवसायिकांना आणि सुज्ञ ग्राहकांना सुरक्षा प्रदान करणे, पोलीस प्रशासनाची कायदेशीर फी ( हप्ते )कमी करण्यात यावे.

त्यांना अधिकृत जागा मोजणी करून देणे, तसेच अनधिकृत रित्या अतिक्रमण करून व्यवसाय करणाऱ्या शेतकरी मजूर यांच्या व्यवसायावर आणि घरावर बुलडोजर चालवणे.

कायदेशीर वरली मटका क्लब चालविणाऱ्या सुशिक्षित व्यवसायिकांसाठी व ग्राहकांसाठी मृत्री घर, संडास,बाथरूम, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, शहरातील महिलांसाठी बांधण्यात आलेले शौचालय बंद करण्यात यावे.

शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव, वृद्ध कलावंतांचे अर्ज भरून घेणे त्यांना त्वरीत मानधन वाटप करने, नगरपरिषद बुलढाणा अंतर्गत विविध विकास कामांसाठी खोदण्यात आलेले रस्ते, खड्डे, रोडवरील बाहेर आलेले लोखंडी गज त्वरित दुरुस्त करणे.

विकास कामे करत असतांना वाहतुकीस,व नागरिकांना अडथळा येणार नाही यासाठी बँरीकेट,मॅट लावणे.

यासह जिल्ह्यातील ज्वलंत समस्यांचा समावेश राहणार आहे.

जिल्ह्यातील पीडित माता-पिता, वरली मटका, क्लब चालविणाऱ्या सुशिक्षित व्यवसायिकांनी, शेतकरी, शेतमजुरांनी वृद्ध कलावंतांनी, आपल्या न्याय हक्कासाठी सहभागी व्हावे.

असे आवाहन आझाद हिंदच्या वतीने सुरेखाताई निकाळजे, मिराबाई ठाकरे, आशाताई गायकवाड, वर्षाताई ताथरकर, मनीषाताई झांबरे, पंचफुलाबाई गवई,सिंधुताई अहेर, नलिनीताई उन्हाळे, अँड.सतीशचंद्र रोठे, संजय ऐंडोले, शेख सईद, श्रीकृष्ण कोकाटे, यूसूफ शहा, सुशीलराजे देशमुख, मोहम्मद सोफियान, कूरबान शहा,गजानन झांबरे, योगेश कोकाटे यांनी केले आहे.

Leave a Comment