आठवडी बाजार परिसरात समता टेलर दुकानासमोर वरली मटका नावाचा जुगारावर शहर पोलिसांनी छापा मारून एकाला घेतले ताब्यात

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त व खात्रीशीर माहितीवरून शहर पोलिसांनी ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आठवडी बाजार परिसरात

समता टेलरच्या दुकानासमोर पैशाच्या हारजीत वर वरली चे आकडे घेताना रजनीकांत बांगर वय 37 वर्ष याला शेअर पोलिसांनी ताब्यात घेतले पोलीस कॉन्स्टेबल शांताराम घुगे बक्कल नंबर 2036 यांनी दिलेल्या

फिर्यादीवरून शहर पोलीस स्टेशन मध्ये कलम 12 मुंबई जुगारबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संतोष गवई बकल नंबर 715 करीत आहेत

Leave a Comment