आदिवासी ग्राम चारबनमध्ये अधिकाऱ्यांनी धरला फेर! तिरंगा यात्रेने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवास सुरुवात

 

जळगाव जामोद/पल्लवी कोकाटे

जळगाव जामोद तालुक्यातील आदिवासी ग्राम चारबन येथे ग्राम सभा घेऊन व गावात हर घर तिरंगा याची प्रचार यात्रा काढून या महोत्सवाला सुरुवात करण्यात आली.यावेळी विद्यार्थी व गावकऱ्यांसमवेत अधिकारी वर्गाने आदिवासींच्या ढोलावर नृत्य करीत आनंद उत्सव साजरा केला.
यावेळी आदिवासी विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आदिवासींची परंपरागत वेशभूषा परिधान केली होती.या आनंदोत्सव प्रसंगी उपविभागीय महसूल अधिकारी वैशाली देवकर,तसीलदार शीतल सोलाट, गटविकास अधिकारी शिवशंकर भारसाकळे, गटशिक्षणाधिकारी‌ एन.जे फाळके, पंचायत विस्तार अधिकारी संदीप मोरे , ग्रामसेवक अनिल अंबडकर यांच्यासह सन्मान परिवारचे प्रा.श्याम फाफट, केंद्रप्रमुख केशरसिंग राऊत,अध्यापक दीपक उमाळे, गोवर्धन दांडगे, ममता गावित, उदयसिंग पटेल उपस्थित होते.
भारत माता की जय व हर घर तिरंगा या घोषणांनी परिसर दणाणून गेला.प्रचार यात्रेची सांगता जिल्हा परिषद शाळा चारबन येथे झाली.
यावेळी उभारण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचा विद्यार्थी , गावकरी व मान्यवरांनी आनंद घेतला.सूत्रसंचालन दिपक उमाळे यांनी तर ग्रामसेवक अनिल अंबडकर यांनी आभार प्रदर्शन केले.

Leave a Comment